संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त आनंदोत्सव साजरा
संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त आनंदोत्सव साजरा
संपादक:- रवींद्र जगताप
राम आएंगे तो अंगना सजाऊंगी… हे गाणे आजकाल प्रत्येकाच्या ओठावर आहे आणि का नाही… शेवटी प्रभू राम येत आहेत. संपूर्ण देश भक्तीभावाने भरला असून रामललाच्या स्वागतासाठी आतुर झाला आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी उत्साहात पार पडत असून शाळा व कॉलेजला देखील सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. याच उत्सवाचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम मध्ये विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम,माता सीता व हनुमाची आकर्षक वेशभूषा करून प्रभू श्रीरामाचा जय घोष केला. तसेच प्रभु रामाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना राम मंदिरा विषयी माहिती दिली व रामरक्षा स्तोत्राचे पठन केले. शाळेत आकर्षक रांगोळ्या,विद्युत रोशनाई,भगवे ध्वज व दिव्यांची सजावट करण्यात आली होती. सर्व विद्यार्ध्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले व प्रभू श्रीरामाच्या गाण्यांच्या तालावर सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी ठेका धरत जल्लोष केला. या वेळी विद्यार्थी,पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





