ब्रेकिंग

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची संधी’-डाँ. भगीरथ शिंदे

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची संधी’-डाँ. भगीरथ शिंदे

कोपरगाव महाविद्यालयात रयत स्पर्धा परीक्षा कॅडमीचे उद्घाटन

कोपरगाव- “ज्ञान म्हणजे प्रभावी व्यवस्थापन असून माहितीचे ज्ञानात रूपांतर होण्यासाठी सखोल चिकित्सा आवश्यक असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असून, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते, असे प्रतिपादन ड. भगीरथ शिंदे यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद् गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् ण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथे विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. ड. संदीप वर्षे यांनी भूषविले.

जाहिरात ज्योती
जाहिरात

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक मा. श्रीमती उषाताई पवार यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती नेहमी डोळ्यासमोर ठेवावी, असे सांगितले. अभ्यासाचे तसेच वेळेचे योग्य नियोजन करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच वर्तमानातील वास्तवाची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

जाहिरात

अध्यक्षीय मनोगतात ड. संदीप वर्षे यांनी संघर्ष केल्यानंतरच यशाची खरी किंमत कळते, असे प्रतिपादन केले. आजच्या काळात स्पर्धा परीक्षांना पर्याय नसून सातत्य, संयम आणि अखंड प्रयत्न हे यशप्राप्तीचे महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. प्राचार्यांनी आपल्या प्रास्ताविकांमध्ये पाहुण्यांचा शब्दसुमनांनी स्वागत करून, जगात घडणारे सामाजिक, शैक्षणिक व तांत्रिक बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था सातत्याने करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. महेंद्रकुमार काले, तसेच मा. डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, वाणिज्य विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश मालपुरे, यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक, शिक्षकेतर सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार डॉ. सीमा दाभाडे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते व प्रा. प्रतीक्षा संवत्सरकर यांनी केले.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून

https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे