प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांना भावपूर्ण निरोप
आँख से दूर सही दिल से कहा जायेगा !
*ऐ जानेवाले तू हमे याद बहुत आयेगा !!
प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांना भावपूर्ण निरोप
श्रीरामपूर प्रतिनिधी:येथील नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर दगडू पटारे हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व नगरपालिका शिक्षण मंडळाचे वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.डावखर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी धनंजय कवीटकर हे होते. व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, माजी गट शिक्षणाधिकारी के.पी. बोरुडे, सुभाष पवार,माजी गटविकास अधिकारी शामराव पुरनाळे, शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे,भैरवनाथ नगरचे सरपंच भारत तुपे, शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब सरोदे, माध्यमिक सोसायटीचे माजी चेअरमन सूर्यकांत डावखर आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना सर्वच वकत्यांनी श्री.पटारे यांच्या कार्यशैलीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सर्वांशी मितभाषी वागणारे, शांत स्वभावाचे, कमी बोलणारे परंतु आपल्या कार्याप्रती सजग असणारे असे पटारे साहेब शासनाच्या नियमानुसार निवृत्त होत असले तरी प्रत्यक्ष ते कधीही निवृत्त होणार नाही असा आशावाद अनेक वक्त्यांनी व्यक्त केला. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. चांगल्या कामाची प्रशंसा केली. चांगले कार्य करणाऱ्यांना नेहमी साथ दिली. श्रीरामपुरातील पाच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कोणत्याही मुख्याध्यापक अगर शिक्षकाला साधा मेमो दिला नाही. मात्र प्रत्येकाकडून त्यांच्या योग्यतेनुसार कार्य करवून घेतले. शासनाच्या सर्व योजना या प्रभावीपणे राबविल्या असे गौरवोदगार मान्यवरांनी याप्रसंगी काढले.श्री.पटारे शासकीय नियमानुसार निवृत्त होत असले तरी प्रत्यक्ष ते काही निवृत्त होणार नाहीत. त्यांचे कार्य प्रेरणादायी होते असा गौरवल्लेख माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केला.
पटारे हे माझे चांगले मित्र होते. आम्ही सोबत काम केले. कार्याच्या प्रती त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे असे अकोल्याचे माजी गट शिक्षणाधिकारी सुभाष पवार यांनी सांगितले.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

शिक्षक बँकेचे माजी चेअरमन, न.पा.उर्दू शाळा क्र. ५ चे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी आपल्या भाषणामध्ये पटारे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले. आमच्या उर्दू शाळेची जी काही प्रगती झाली, आम्ही जेवढे काही उपक्रम शाळेत राबवू शकलो, त्या कामी पटारे साहेबांची भक्कम साथ आम्हाला होती. त्यामुळे आम्ही हे कार्य करू शकलो. प्रत्येक चांगल्या कार्याला त्यांनी कधी नकार दिला नाही. त्यांची मोलाची साथ आणि सहकार्य यामुळे आम्ही प्रगती करू शकलो असे सांगून
*आँख से दूर सही दिल से कहा जायेगा !*
*ऐ जानेवाले तू हमे याद बहुत आयेगा !!*
असा शेर पेश केला. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
शिक्षण मंडळाच्या वतीने बोलताना वरिष्ठ लिपिक किशोर त्रिभुवन यांनी पटारे साहेब यांचे सोबत काम करताना आलेले आपले अनुभव विशद केले.
निवृत्त शिक्षिका लता औटी यांनी पटारे साहेबांनी सर्व गट तट, संघटना यांना बरोबर घेऊन काम केले. त्यांच्या काळात नगरपालिका शाळांची चांगली भरभराट झाली.अनेक भौतिक सुविधा शाळांमध्ये निर्माण झाल्या असे सांगितले.याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,माजी गटविकास अधिकारी शामराव पुरनाळे,माजी गटशिक्षणाधिकारी के.पी. बोरुडे,शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे,सोनाली पैठणे,अल्ताफ शाह, दिनेश तरटे, अजय शिंदे, केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, राहुरीचे कांबळे सर, रवींद्र कांबळे, ऋषिकेश पटारे, बाळासाहेब सरोदे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.सत्काराला उत्तर देताना प्रशासन अधिकारी पटारे यांनी कर्तव्य बजावत असताना ज्या ज्या ठिकाणी मी काम केले तेथे लोकांनी मला खूप सहकार्य केले. त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे माझी कारकीर्द यशस्वी झाली असे सांगितले.याप्रसंगी विविध संघटना व शाळांच्या वतीने श्री व सौ पटारे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ अकोलकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपालिका शिक्षण मंडळाचे लेखापाल रुपेश गुजर, किशोर त्रिभुवन, संभाजी त्रिभुवन, शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांनी परिश्रम घेतले. शाळा क्रमांक सहाच्या शिक्षिका यास्मिन शेख यांनी प्रवेशद्वारावर काढलेली रांगोळी लक्षवेधक होती. कार्यक्रमास सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक शहरातील मान्यवर, पटारे कुटुंबियांचे नातेवाईक,आप्तेष्ट, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*


