आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नांतून शिर्डी विमानतळ विकासाला आर्थिक बळ ३४.९५ कोटींच्या निधीला शासनाची प्रशासकीय मान्यता; प्रलंबित कामांचा मार्ग मोकळा




आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नांतून शिर्डी विमानतळ विकासाला आर्थिक बळ ३४.९५ कोटींच्या निधीला शासनाची प्रशासकीय मान्यता; प्रलंबित कामांचा मार्ग मोकळा



विमानतळाच्या विकासासाठी केलेल्या या पाठपुराव्याची शासनाने दखल घेत ३४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून विमानतळाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. विमानतळाच्या सुविधांमध्ये वाढ होवून भविष्यात विमानसेवेला चालना मिळण्यासोबतच शिर्डीला येणाऱ्या देश-विदेशातील साईभक्तांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. त्याचा सकारात्मक परिणाम काकडीसह कोपरगाव आणि परिसरातील गावांच्या व्यापार, व्यवसाय व आर्थिक उलाढालीवर होणार आहे.





शिर्डीला भेट देणाऱ्या साईभक्तांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि विमानतळाचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार आणि उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आहेत.



