माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या हस्ते शकील अँटो गँरेज चे उदघाटन संपन्न

माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या हस्ते शकील अँटो गँरेज चे उदघाटन संपन्न
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव शहरातील घटनाकार मैत्री संघाचे शहर उपाध्यक्ष शकील तांबोळी अनेक वर्षापासून अँटो गँरेजच्या माध्यमातून कोपरगावकरांना सेवा देत आहे.शकील तांबोळी हे सर्व प्रकारच्या टु-व्हिलर दुरूस्तीचे काम करत आहे. आजच्या आधुनिक युगात टु व्हीलर गँरेज सेवा अंत्यत गरजेची झालेली आहे.दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या टु व्हिलर मोटार सायकली बाजारात येत असुन यासाठी प्रशिक्षित कारगिर असणे आवश्यक असते.शकील तांबोळी यांचा या क्षेत्रात तगडा अनुभव असुन अनेक ग्राहक त्यांच्याकडे आपल्या मोटारसायकली दुरूस्तीचे काम करत असतात.या अनुभवाच्याच जोरावर शकील तांबोळी यांनी स्वतःचा शकील अँटो गँरेज व्यवसाय सुरु केला असुन नुकतेच माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या हस्ते त्यांच्या या नविन फर्मचे उदघाटन झाले आहे.याप्रसंगी घटनाकार मैत्री संघप्रमुख गौतम बनसोडे घटनाकार मैत्री संघ संस्थापक नितीन बनसोडे व असंख्य मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.








