कृषीवार्ता

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शेतक-यांचे हितचिंतक-बिपीनदादा कोल्हे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमीत्त संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे पुष्पांजली अर्पण करतांना.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शेतक-यांचे हितचिंतक-बिपीनदादा कोल्हे.
संपादक :-रविंद्र जगताप
कोपरगाव :-  भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानाचे प्रमुख भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतक-यांच्या उन्नतीसाठी ब्रिटीशांबरोबर संघर्ष केला. त्यांचे शेतीविषयक विचार आजही जसेच्या तसे लागू होतात,. राजकीय शक्तीच सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली असुन जनतेत तेज आणि जागृती निर्माण होण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांचा ठेवा मोठा असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुकवारी साजरी करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक ज्ञानेश्वर होन, निलेश देवकर यांच्यासह सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, विभागप्रमुख आदिंनी आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक केले.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाचा पाया बाबासाहेब आंबेडकर यांनी घातला. शेती, सहकार, राजकीय, सामाजिक, आर्थीक, सांस्कृतिक, कामगार आदि प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान आपण कदापीही विसरू शकत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदुमिलच्या जागेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्यदिव्य स्मारकाचे काम सुरू करून त्यांच्या विचारांचा वारसा जपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्री महोदयांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा तळागाळातील लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी १६ हजार ४९४ कोटी रूपयांची तरतुद केली आहे. शहर व ग्रामिण भागासाठी सुमारे दीड लाख रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उददीष्ट ठरवुन त्यानुरूप कामाला चालना दिली आहे. येथील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना बार्टीमार्फत फ्रेंच, रशियन, जपान, जर्मन, स्पेन भाषेत शिक्षणाच्या संधी निर्माण करून दिल्या आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आणि चैतन्यातुन लोकशाहीचे सहजीवन अभ्यासता येते. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतुन राज्यातील असंख्य लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य १ हजारावरून प्रति महिना एक हजार पाचशे रूपयापर्यंत वाढविण्यांत आले आहे. नागरिक घडविण्यांचे केंद्र शाळा असल्याने सहा ते चौदा वर्षापर्यंत त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. भारतीय समाज व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवून आणण्यात महापुरूष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा असून शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदि विद्वत्तांनी भारत देशाला जागतिक पातळीवर सर्वार्थाने सिध्द केले आहे असेही ते शेवटी म्हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे