देश-विदेश

लाखाचा पोशिंदा :-विजूमामा डिबरे.चालक, संजीवनी कारखाना.

लाखाचा पोशिंदा :-विजूमामा डिबरे.चालक, संजीवनी कारखाना.
         संपादक :- रविंद्र जगताप
 आज जगामध्ये जो तो आपल्याच संपत्तीत वाढ होऊन मोठा होऊ पहात आहे, पण त्याला अपवाद आहे आमचे साहेब. संजीवनी उद्योग समुह स्वामी सहजानंदभारती यांच्या कार्य प्रेरणेतून घडविण्यांत माजीमंत्री स्व. शंकरराव गेनूजी कोल्हे वाक‌बगार ठरले. त्यांच्या वाहनाचे चक्रधारी म्हणुन सारथ्य करण्याचे आम्हांला भाग्य मिळाले. स्व. शंकररावजी कोल्हे साहेब लाखाचे पोशिंदे होते. त्यांनी असंख्य गोर-गरीब, दीन- दलित, वंचित, मध्यमवर्गीय, अल्पसंख्याक, अल्पभुधारक, बहूभूधारक, श्रीमंत आदिच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले. ट्रॅफिकचा अभ्यास त्यांचi तोंडपाठ असे, एकवेळ आमचे नियोजन चुकेल पण त्यांचे नियोजन कधीच चुकायचे नाही.
              स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सहचारिणी सिंधुताई उर्फ माई यांनी आम्हांला खुप सांभाळुन घेत जीव लावला. आई सारखे प्रेम दिले. चालका शेजारीच त्यांचे नेहमी बसणे असायचे. ते मंत्री जरी राहिले तरी त्यांनी प्रवासात पुढच्या सीटवर बसण्याची जागा कधीच सोडली नाही. ग्रामीण शैलीतील बाज असल्याने कोपरीवरच प्रवास करायचे.त्यांची पर्सनैलिटी रुबाबदार होती.आंतरराष्ट्रीय शेती व्यापार करार आणि त्यासंदर्भात संपुर्ण महाराष्ट्रभर स्व. शंकरराव कोल्हे यांनी जनजागृती केली. त्यानिमीत्ताने महाराष्ट्र राज्यभर प्रवास झाला.एकदा मला मुतखडयाचा प्रचंड त्रास झाला, पण प्रवास करतांना साहेबांना काय सांगायचे, पण साहेबांनीच माझी अवस्था पाहून मला अगोदर दवाखान्यांत नेले. किती काळजी घेतली तब्येत बरी केली. मगच त्यांनी त्यांचे महत्त्वाचे असलेले काम केले, यावरून त्यांचे आम्हांवर किती प्रेम होते.
 दादा पाटील शेळके, शिवाजीराव नागवडे, हे कोल्हे साहेबांचे जीवलग मित्र त्यामुळे त्यांच्या मैत्रीतूनच आम्हा चालकांची मैत्री जडली.  त्यांची क्षणा-क्षणाला आम्हांला आठवण होते; अशा आमच्या साहेबांना, लाखाच्या पोशिंद्याला मानाचे अभिवादन ! परमेश्वर त्यांच्या कार्याची संजीवनी सर्वांना प्रदान करो हीच प्रार्थना.
विजूमामा डिबरे.चालक, संजीवनी कारखाना.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे