सामाजिक

जेऊर कुंभारी गावत बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड मोहीम!

  • जेऊर कुंभारी  गावत  बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड मोहीम!!

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनखाली भव्य वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली.वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने जगावर थैमान घातले त्यावेळी ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले आहे वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल राखता येईल या हेतूने काही दिवसांपूर्वी जेऊर कुंभारी स्मशानभूमीत  बिहार पॅटर्न अंतर्गत स्मशानभूमी,शालेय परिसर,रस्त्याच्या कडेला चिंच, कडुलिंब, वड पिंपळ, अशा विविध जातीच्या ३०० झाडांची भव्य  वृक्ष लागवड करण्यात आली या लागवडीची  उपसरपंच ताराचंद लकारे, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण,  ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड, ग्रामविकास अधिकारी केबी रणछोड, यांनी अज ३० जुलै रोजी पाहणी केली.तसेच वृक्षाचे संगोपन करण्यासाठी ग्रमपंचायत मार्फत मजुरांची व्यवस्था केली आहे अशी माहिती उपसरपंच ताराचंद लकारे यांनी दिली.  या वेळी माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी सांगितले की जेऊर कुंभारी गावातील नागरिकांनी गायगोठ्याची स्किम जास्त प्रमाणात राबविण्यासाठी नरेगा मधुन वृक्षारोपण करावे.तसेच नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत वृक्ष उपलब्ध करून दिले जाईल.वृक्षारोपण करण्यातसाठी ग्रामस्थांनी  पुढाकार घ्यावा असे आवाहन माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी केले.सूत्रसंचालन प्रदिप गायकवाड यांनी केले तर आभार  उपसरपंच ताराचंद लकारे यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे