महिलांनी मानसिकरित्या सक्षम बनावे…. प्रा. वर्षा आहेर
महिलांनी मानसिकरित्या सक्षम बनावे…. प्रा. वर्षा आहेर
कोपरगाव दिनांक “स्त्रीवाद हा पुरुषविरोधी विचार नाही तर त्यामध्ये संधीची समानता महत्त्वाची आहे. तो स्त्रियांचा मूलभूत अधिकार आहे, म्हणून विद्यार्थिनींनी विद्यार्थीदशेतच स्वतःला मानसिक, शारीरिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवावे. स्त्रिया कौटुंबिक, व्यावसायिक क्षेत्रामध्ये उत्तमरीत्या संतुलन करू शकतात आणि त्या अनुषंगाने समाजातील सर्वच घटकांकडून स्त्रियांना संधीची समानता उपलब्ध व्हावी. किंबहुना ती काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रा. वर्षा आहेर यांनी महिला सबलीकरण कक्ष अंतर्गत ‘स्व-संरक्षण’ विषयावर व्याख्यान देताना केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. सी. ठाणगे यांनी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख डॉ. नीता शिंदे यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसंदर्भात जसे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, ‘महिला हेल्पलाइन योजना’, उज्वला योजना, ‘सपोर्ट ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम’ फॉर महिला शक्ती केंद्र तसेच महिलांसाठी आरक्षण इत्यादी योजना या संदर्भात देखील माहिती दिली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महिला सबलीकरण कक्षाच्या सदस्य डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. मयुरी आहेर यांनी केले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महिला सबलीकरण कक्षाच्या सदस्य प्रा. नन्नवरे, प्रा. जयश्री खंडेझोड, प्रा. सुवर्णा चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुप वर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
उत्तर भारत vs दक्षिण भारत? महाराष्ट्राचे नुकसान होईल का,महाराष्ट्रात अद्यापही अंधारात सविस्तर बातमीसाठी खालील लिंक
शनी शिंगणापुर येथे शनीदेवाला आता ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
संपादक रवींद्र जगताप


