ब्रेकिंग

नाशिकमध्ये रंगणार राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार सोहळा; अभय सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती

 

नाशिकमध्ये रंगणार राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार सोहळा; अभय सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती

‘दैनिक सकाळ’चे संपादक अभय सुपेकर यांना ‘क्रांतीसूर्य व क्रांतीज्योती राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’ सोहळ्याचे प्रमुख अतिथी

नाशिक :(प्रतिनिधी दत्तात्रय घुले )संविधान दिनानिमित्त पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी (अशोक स्तंभ, नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतीसूर्य व क्रांतीज्योती राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शालिमार येथील मु. श. औरंगाबादकर सभागृहात पार पडणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दैनिक ‘सकाळ’चे नाशिक आवृत्तीचे संपादक मा. अभय सुपेकर यांना कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. आनंद आहिरे यांनी प्रत्यक्ष भेटून दिले.


या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात देशभरातील सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा ‘क्रांतीसूर्य व क्रांतीज्योती राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. डॉ. आनंद आहिरे यांनी दिली.पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 59 च्या वरती आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय साहित्य संमेलन कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे