ब्रेकिंग

कोपरगावात रामराज्य युवा यात्रेचे स्नेहलताताई कोल्हे यांनी केले पूजन; प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन घेऊन मिरवणुकीत नोंदवला सहभाग

  
कोपरगावात रामराज्य युवा यात्रेचे स्नेहलताताई कोल्हे यांनी केले पूजन; प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन घेऊन मिरवणुकीत नोंदवला सहभाग
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव : अयोध्या येथील नवनिर्मित श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून, त्यानिमित्त सुदर्शन वाहिनीचे संपादक संचालक हिंदू धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांच्या पुढाकारातून श्रीलंकेहून अयोध्येला निघालेल्या रामराज्य युवा यात्रेचे व प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे बुधवारी (२७ डिसेंबर) सकाळी कोपरगाव शहरात आगमन झाले. यावेळी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीने या यात्रेचे स्वागत केले व प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले. तद्नंतर त्यांनी शहरातून सवाद्य काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभाग नोंदवला. श्रीरामाचा जयघोष करीत निघालेल्या या मिरवणुकीत असंख्य रामभक्त व सकल हिंदू समाजबांधव सहभागी झाले होते.अयोध्या येथील नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण व प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व अनेक संत, महंतांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानिमित्ताने हिंदू धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांच्या पुढाकाराने श्रीलंकेहून आणलेल्या प्रभू श्रीरामांच्या पादुकांसह रामराज्य युवा यात्रेचे अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे २७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता कोटमगाव येथून येवला नाकामार्गे कोपरगाव शहरातील श्री विघ्नेश्वर मंदिर येथे आगमन झाले असता सकल हिंदू समाजाच्या वतीने जल्लोषात व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. श्री विघ्नेश्वर मंदिरात माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, हिंदू धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके, रामायण सर्किटचे अध्यक्ष रामअवतारजी शर्मा व असंख्य रामभक्तांच्या उपस्थितीत या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात येऊन या पादुकांची सजवलेल्या पालखीतून शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवे झेंडे फडकावत टाळ, मृदंग, वीणा, झांजच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या मिरवणुकीत स्नेहलताताई कोल्हे यांनी डोक्यावर प्रभू श्रीरामांच्या पादुका घेऊन सहभाग नोंदवला.
यावेळी प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी महिलांसह रामभक्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. डोक्यात भगव्या टोप्या घालून हातात भगवे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या रामभक्तांनी जय श्रीराम, प्रभू सियावर रामचंद्र की जय, राम, लक्ष्मण, जानकी, जय बोलो हनुमान की, हिंदू शक्ती तेरा नाम, जय श्रीराम, जय श्रीराम, भारतमाता की जय, वंदे मातरम् आदी घोषणा देत सारा आसमंत दणाणून सोडला होता. मिरवणुकीत अरुण महाराज मगर, रत्नाकर महाराज जंगम, बाळासाहेब सुरासे, रामकिशन शिंदे, ऋषभ मगर आदींसह भजनी मंडळ भजन गात सहभागी झाले होते. श्री विघ्नेश्वर मंदिरापासून निघालेली ही मिरवणूक गुरुद्वारा रोड, टिळकनगरमार्गे गांधीनगरातील हनुमान मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर तेथे स्नेहलताताई कोल्हे, सुरेश चव्हाणके, प्रदोष चव्हाणके यांच्या हस्ते श्री हनुमान स्तंभाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. नंतर प्रभू श्रीरामांच्या पादुका मिरवणुकीद्वारे सावरकर चौक येथे नेण्यात आल्या. तेथे जे रामभक्त कारसेवेसाठी गेले होते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या मिरवणुकीत आ. आशुतोष काळे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, ‘महानंद’ चे अध्यक्ष राजेश परजणे, ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. रवींद्र बोरावके, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, न. प. तील माजी गटनेते रवींद्र पाठक, शिवसेनेचे कैलास जाधव, कलविंदर दडियाल, शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख विमलताई पुंडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, नारायणशेठ अग्रवाल, उध्दवशेठ विसपुते, मनोहर कृष्णाणी, टेकचंद खुबाणी, ॲड. जयंत जोशी, कुकुशेठ सहाणी, संतोष गंगवाल, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक अतुलशेठ काले, अशोक लकारे, बबलू वाणी, कैलास खैरे, वैभव आढाव, महावीर दगडे, गोपीनाथ गायकवाड, विनायक गायकवाड, अनिल गायकवाड, चेतन खुबाणी, जयेश बडवे, सतीश नरोडे, सुभाष परदेशी, नरेंद्र डंबीर, सागर राऊत, कैलास शेळके, गणेश आढाव, विजय चव्हाणके, सचिन सावंत, चंद्रकांत वाघमारे, जयप्रकाश आव्हाड, सागर जाधव, विजय वडांगळे, प्रसाद आढाव, आशीष निकुंभ, शंकर बिऱ्हाडे, संतोष नेरे, गोरख देवडे, राजेंद्र डागा, विक्रांत सोनवणे, संतोष साबळे, समीर गवळी, सतीश चव्हाण, संजय तुपसुंदर, सागर गंगुले, रोहण दरपेल, धनंजय धनवटे आदींसह सकल हिंदू समाजबांधव, रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे