किशोर चोरगे महापुरुषांच्या विचारांचा खरा अनुयायी शिक्षणासाठी झटणारा कोपरगावच्या क्षितिजावरचा लकलकणारा ध्रुवतारा :-दिलीप घुमरे
किशोर चोरगे महापुरुषांच्या विचारांचा खरा अनुयायी शिक्षणासाठी झटणारा कोपरगावच्या क्षितिजावरचा लकलकणारा ध्रुवतारा :-दिलीप घुमरे
आज शिक्षणाच व्यापारीकरण हे सर्रास होत आहे केलं जातं आहे संविधानाने दिलेल्या सर्व शिक्षणाचा अधिकार खाजगीकरणाने संपुष्टात येत आहे शासनाने शासकिय शाळा खाजगी करण्याच्या घोषणा झाल्या आणि शासनाने मजुर वर्ग निर्माण करण्याच्या षडयंत्राला ओळखुन किशोर चोरगे यांनी प्रखर विरोध करून अनेक वेळा आंदोलन केले आज कै.वसंतदादांच्या आत्म्यांला मुलाचं कार्य स्वर्गातुन पाहताना आनंद वाटत असेन किशोर चोरगे यांनी लोकप्रतिनिधी व शिक्षणमंत्री यांच्या पर्यंत पाठपुराव्याचे ब्रह्मास्त्र नेहमी चालवले स्थानिक शाळा असो अथवा राज्य शासनाचा शाळा बंद करण्याचा खाजगीकरणाचा अन्यायी निर्णय असो कि शासकिय शाळा बंद होण्या पासुन वाचवत त्या शाळा अधुनिकरणाचा विषय असो ,सामन्य माणसाला शिक्षणाचा अधिकार संविधानाने दिला आहे तो अबाधित राहिलाच पाहिजे तो राहण्यासाठी लढणारा शिक्षणासाठी झटणारा ध्रुवतारा आज बनला आहे शिक्षणाच व्यापारीकरण होत असलेल्या आजच्या काळात सामन्य जनतेला अगदी मोफत सर्व शिक्षण अधिकार मिळणे कठीण झाले आहे अस्या सर्व सामान्य कुटुंबातील कृष्णा उर्फ किशोर चोरगे हा खालावलेल्या शिक्षण व्यवस्थेला पुर्नरजिवित करण्यासाठी झटत आहे उद्याच्या कोपरगांवच्या क्षितीजावर शिक्षणाचं नवंयुगाचा प्रणेता ध्रुवतारा आहे
अनेक वर्षांपासून शासनाशी लेखणीच्या माध्यमातून लढत असतांना वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा महापुरुषांच्या कार्याचा वारसा जपणारा दवबिंदू आहे अनेक विषय जे गावच्या हितावह आहे त्यावर आवाज उठवणारा गाव अधुनिकरण व शासकिय न.पा.शाळा अधुनिकरण होण्याच्या संकल्पनेला जन्म देणारा दीपस्तंभ आहे सतत दुसऱ्याच्या संकटात धाऊन जाणारा निस्वार्थ कार्य करणारा जनसामन्यांचा आधारवड खरा सामाजिक कार्यकर्ता आहे युवकांना मार्गदर्शक ठराव अस्या व्यक्तिमत्वाचा धनी किशोर चोरगे म्हणजे सामाजिक शैक्षणिक कार्यातुन त्यांच्या माता पित्याचे नाव लौकिक करणार कार्य करत आहे व महापुरूषांच्या विचारांवर चालणारा खरा अनुयायी असुन शिक्षणासाठी झटणारा ध्रुवतारा बनला आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते दिलीप घुमरे यांनी कै.वसंतदादा चोरगे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमा निमित्त मांडले आहे




