आँनलाईन खरेदी टाळा,स्थानिक व्यापार्याकडुनच मालाची खरेदी करा:- गौतमराव बनसोडे
आँनलाईन खरेदी टाळा,स्थानिक व्यापार्याकडुनच मालाची खरेदी करा:- गौतमराव बनसोडे
अनेक वर्षापासून आपल्या गावात, आपल्या वस्तीत,आपल्या शहरात अनेक व्यापारी आपल्याला हव्या असलेल्या वस्तु माल किराणा सामान अशा विविध प्रकारच्या वस्तु स्थानिक व्यापारी यांच्या दुकानातून आपण खरेदी करत असतो.पैसा असो किंवा नसो उधारीवर अनेक व्यापारी माल देत होते.हेच व्यापारी आपल्या सुखा दुखःत सहभागी होत असतात. आजच्या आँनलाईन खरेदीत अनेकदा फसवणूक होत असते.आपल्या मोबाईलचे पासवर्ड, बँक डिटेड बराचसा डाटा हँक होवु शकतो.किंवा चोरी जावु शकतो.आँनलाईन खरेदीत करणे हा ज्याचा त्याचा व्ययक्तिक विषय आहे.परंतु स्थानिक व्यापारी यांच्याकडून खरेदी केल्यास. स्थानिक बाजारपेठेस चालना मिळेल.त्यामुळे स्थानिक व्यापारी यांच्याकडुनच येणार्या दिवाळीत खरेदी करावी असे आवाहन घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.



