सामाजिक

नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे या प्रखर देशभक्त महापुरुषांना विनम्र अभिवादन -विवेकभैय्या कोल्हे

नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे या प्रखर देशभक्त महापुरुषांना विनम्र अभिवादन -विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव : आझाद हिंद सेनेचे संस्थापक, थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि युवकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे सच्चे देशभक्त स्व.बाळासाहेब ठाकरे हे दोघेही देशहितासाठी लढणारे प्रखर देशभक्त होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक व राजकीय जीवनात काम करताना नेहमीच निर्भीडपणे आपले मत मांडले. त्यांनी देशहिताचे कायम समर्थन केले.तसेच सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून देशाला उभारी देण्यासाठी लढा उभा केला हे दोनही महापुरुष परखड भुमीका ठेवून आयुष्य जगले त्यांचा हा गुण सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे,असे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केले.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे तसेच आझाद हिंद सेनेचे संस्थापक, थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती सोमवारी (२३ जानेवारी) कोपरगाव शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित आयोजित कार्यक्रमास युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून स्व.बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस हे महान स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना करून स्वातंत्र्याचा लढा बळकट केला. त्यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणेच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हेही प्रखर देशभक्त म्हणून सर्वांच्या मनात नेहमी आदरयुक्त आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना देशप्रेमाची भुमिका मांडतांना निर्भीडपणे आपले मत मांडले. त्यांनी देशहिताचे कायम समर्थन केले. जे बरोबर आहे त्याला बरोबर आणि जे चुकीचे आहे त्याला चूक आहे, असे व्यक्तिमत्त्व होते.सार्वजनिक जीवनात काम करताना परिणामाची चिंता न करता जे बरोबर आहे त्याला बरोबर व जे चूक आहे त्याला चूक आहे हाच विचार अमलात आणण्याचा दृढनिश्चय आपणही या जयंतीनिमित्त केला असे प्रतिपादन त्यांनी केले.
राजकीय जीवनात पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकीय मतभेद बाजूला ठेवून सदैव मदतीचा हात देण्याचे काम स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केले.एक परखड देशभक्त व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे या दोन्ही महापुरुषांनी देशभक्तीचे रुजवलेले विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे विचार विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र सोनवणे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, भाजपचे नगरपालिकेतील माजी गटनेते रवींद्र पाठक, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माधवराव आढाव सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, माजी नगरसेवक डॉ. अजेय गर्जे, अनिल जाधव, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, शिवसेनेचे शहरप्रमुख सनी वाघ, रावसाहेब थोरात, अक्षय जाधव, मनिल नरोडे, आरपीआयचे शहराध्यक्ष अनिल नन्नवरे, माजी नगरसेवक स्वप्नील निखाडे, जनार्दन कदम, वैभव गिरमे, दिनेश कांबळे, दीपक जपे, विनोद गलांडे, विक्रमादित्य सातभाई, सनी गायकवाड, अनिल जाधव, रवींद्र रोहमारे, ज्ञानेश्वर गोसावी, कुणाल लोणारी, आशिष निकुंभ, निखिल जोशी, शुभम भावसार, गोपीनाथ गायकवाड, पिंटू नरोडे, विनोद चोपडा, शिवाजी खांडेकर, दादासाहेब नाईकवाडे, प्रकाश आहेर, विजय चव्हाणके, दत्तात्रय जाधव, रंजन जाधव, पप्पू पडियार, शंकर बिऱ्हाडे, सिद्धार्थ शेळके, रवी कथले, नितेश बोरुडे, संतोष नेरे, संजय ठाकूर, मयूर लचुरे, रवींद्र सूर्यवंशी, रामदास शिंदे, अल्बास मणियार, बबलू टेलर, खलीकभाई कुरेशी, राजेंद्र डागा, वैभव लोणारी, चंद्रकांत वाघमारे, मुकुंद उदावंत, रुपेश सिनगर, सोमनाथ लोहकरे, पवन कोळपकर, राजेंद्र भंडारी, निलेश महाले, राजेंद्र सातपुते, गोपी सोनवणे, संजय खराटे, अभिषेक सारंगधर, विशाल औटी, बालाजी गोर्डे, राहुल खंडागळे, आदित्य लोणारी, शरद कुलकर्णी, संजय मंडलिक, नंदू देवळालीकर, राहुल आदमाने, दत्तात्रय उदावंत, पप्पू रत्नपारखी, हेमंत गोसावी, गौरीश लोहरीकर, वैभव कुऱ्हाडे, देवा लोखंडे, मीना जोंधळे, बाबासाहेब बढे, विठ्ठल भुजाडे आदींसह भाजप, शिवसेना, आरपीआय आदी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे