कृषीवार्ता

नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकरी बांधवांना भरीव मदत देऊन उभारी द्यावी – मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे 

नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकरी बांधवांना भरीव मदत देऊन उभारी द्यावी – मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे 
” दुष्काळजन्य स्थितीने मोठे नुकसान,सर्वच मंडळांचा समावेश मदत देण्यासाठी करावा- सौ.स्नेहलताताई कोल्हे”
पावसाने दडी मारली असल्याने राज्यासह कोपरगाव मतदारसंघातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.उभी पिके पाण्यावाचून मातीमोल होंताना बघावे लागत आहे.एक रुपयात पीक विमा हा संभाव्य संकटात आधार ठरणार आहे.चालू हंगामात दुष्काळजन्य परिस्थती निर्माण झाली आहे.जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर तसेच संभाव्य उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. खरीप पीकविमा योजनेत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसानभरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाते. या निकाषाला गृहीत धरून पिकांच्या प्रतिकूल हंगामात नुकसानीबाबतचे विमा कंपन्या आणि कृषी विभागाने सर्वेक्षण करावे,अशी सूचना कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्यानंतर पुढील प्रक्रियेला वेग आलेला आहे. या सर्वेक्षण निर्णयाच्या अनुकुलतेबद्दल मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी कृषी आयुक्त व सरकारचे आभार मानले आहे.
हे सर्वेक्षण करतांना कोपरगाव मतदारसंघातील सर्वच मंडळांचा समावेश करावा तसेच कोणतेही मंडळ यातून वगळू नये अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली होती.प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत राज्याने यंदा एक रुपयात पीकविमा उपलब्ध करून दिल्यानंतर पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड असलेल्या सर्वच भागात या निर्णयाने सारवण्यासाठी मदत होणार आहे.राज्य आणि केंद्र सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे,यात स्थानिक प्रशासनाने संबधित निर्णयावर संवेनशीलतेने काम करून जास्तीत जास्त मदत शेतकरी वर्गाला मिळण्यासाठी सहकार्य करावे.
पावसाअभावी पिकांची स्थिती गंभीर असल्याचे विमा योजनेतील तरतुदीनुसार कृषी आयुक्तांनी हे सर्वेक्षण करण्याच्या सूचना करने आवश्यकच होते.या नुसार शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसानभरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाते असा नियम आहे त्यावर पीक विमा कंपन्यांनी देखील सर्व बाबी गांभीर्याने घेऊन या संकटात मोठ्या प्रमाणात मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करत आहोत असेही सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.
सर्व मंडळात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी निर्णय व्हावा तसेच पाण्याच्या कमतरतेुळे चारा उपलब्ध होण्यास अडचण होऊन पशुधन वाचवणे देखील कठीण होत असल्याने जर येत्या काही दिवसात परिस्थती सुधारली नाही तर शासनाने पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे अशीही मागणी केलेली आहे – सौ.स्नेहलताताई कोल्हे
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे