सामाजिक

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत नेत्रदीपक यश.

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत नेत्रदीपक यश.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,  जिल्हा क्रीडा परिषद , जिल्हा क्रीडा कार्यालय अ.नगर,जिल्हा तलवारबाजी संघटना अ.नगर व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय  कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 व 17 सप्टेंबर 2025 रोजी शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा मुले व मुलींचे  आयोजन करण्यात आले होते. सदर  स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या 04 विद्यार्थ्यांनी व 05 विद्यार्थिनीनी तलवारबाजीतील ईपी ,फॉइल व सेबर या तिन्ही क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले आहे. या सर्व विजेत्या 09 खेळाडूंची निवड सोलापूर येथे होणाऱ्या पुणे विभागीय तलवारबाजी स्पर्धेकरिता झाली आहे अशी माहिती के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे सर यांनी दिली. या खेळाडूंच्या यशाबद्दल  को.ता.एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.अशोकराव रोहमारे,सचिव संजीवदादा कुलकर्णी,विश्वस्त मा. संदीपदादा रोहमारे,प्र.प्राचार्य डॉ.व्ही.सी. ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी. आर.सोनवणे,महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे , वरिष्ठ महाविद्यालयाचे शा.शि. संचालक डॉ.सुनिल कुटे,कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना समिती चेअरमन डॉ.डी.एस.बुधवंत सर,क्रीडा शिक्षक श्री.मिलिंद कांबळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे