सामाजिक

अरुण खरात यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा.

अरुण खरात यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी काल आपला वाढदिवस शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला आहे.अरुण खरात यांनी शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात जाऊन तेथे ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला त्यांना साडी, फळे व खाऊ देण्यात आला. शांताबाई कोपरगावकर यांनी आपल्या हाताने वृद्धाश्रमा तील इतर महिलांना फळे व खाऊ दिला. यावेळी वृद्धाश्रमातील सर्वच महिलांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसून आले व त्यांनी सर्वांनीच सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना भरभरून आशीर्वाद दिले. अरुण खरात यांच्या प्रयत्नामुळेच निराधार शांताबाई कोपरगावकर यांना न्याय मिळाला असून त्यांचे जीवन सुकर झाले आहे.

पूर्वी आपला वाढदिवस कधी होऊन गेला हेही कळत नव्हते परंतु आज सोशल मीडियामुळे स्वतः बरोबर सर्व जगालाच आपला वाढदिवस कळतो आज-काल बरीचशी लोक आपला वाढदिवस मोठमोठे फ्लेक्स लावून, डीजे लावून, धांगडधिंगा करून साजरा करतात परंतु सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी ज्या पद्धतीने आपला वाढदिवस वृद्धाश्रमात जाऊन तेथील निराधार ,बेघर , बेवारस असलेल्या लोकांसमवेत साजरा केला ते निश्चितच कौतुकास्पद आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे