सामाजिक

चित्रपट लेखक-दिग्दर्शक के. सुदर्शन यांना ‘कार्यगौरव पुरस्कार’ प्रदान…!

चित्रपट लेखक-दिग्दर्शक के. सुदर्शन यांना ‘कार्यगौरव पुरस्कार’ प्रदान…!

– शिर्डीत भव्य सन्मान सोहळा संपन्न

शिर्डी – महाराष्ट्र नाभिक महामंडळ, उत्तर अहिल्यानगर, शिर्डी नाभिक संघटना आणि समता पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘कार्यगौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन ३१ मार्च २०२५ रोजी साई संत सेना महाराज मंदिर, कनकुरी रोड, शिर्डी येथे संपन्न झाले. नाभिक समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या वेळी गौरव करण्यात आला. यंदाचा प्रतिष्ठित ‘कार्यगौरव पुरस्कार’ मराठी चित्रपट लेखक-दिग्दर्शक सुदर्शन दिलीप खडांगळे यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला हा पुरस्कार भाजपचे युवा नेते व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आणि दैनिक लोकआवाजचे संपादक विठ्ठल लांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

जाहिरात

प्रेरणादायी प्रवास आणि यशाची कहाणी सुदर्शन खडांगळे यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले – “हा पुरस्कार माझ्या मेहनतीचा आणि जिद्दीचा सन्मान आहे. मला मिळालेला हा सन्मान माझ्या अडचणीच्या काळात मदतीला धावून आलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला अर्पण करतो, जे या प्रवासात माझ्या सोबतीला होते आणि आहेत.”

जाहिरात

तरुणांसाठी संदेश आणि नवी घोषणा
खडांगळे यांनी या सोहळ्यात नव्या चित्रपट प्रोजेक्टची घोषणा केली. ते म्हणाले – “मराठीत अनेक नवोदित कलाकार आहेत, पण त्यांना संधी मिळत नाही. मी २०२५ च्या माझ्या चित्रपटात नव्या चेहऱ्यांना महत्त्व देणार आहे.”सुदर्शन खडांगळे यांचा भावनिक आभार प्रदर्शन संदेशमहाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, उत्तर अहिल्यानगर, शिर्डी नाभिक संघटना आणि समता पतसंस्था यांचे मनःपूर्वक आभार! काही क्षण शब्दांच्या चौकटीत बसत नाहीत, ते फक्त अनुभवले जातात. आज माझ्या नाभिक समाजाने मला “कार्यगौरव पुरस्कार” देऊन केवळ माझ्या कार्याचा सन्मान केला नाही, तर माझ्या मेहनतीला, संघर्षाला आणि स्वप्नांना नवी दिशा दिली आहे. त्यासाठी हे २०२५ वर्ष माझ्या नेहमीच लक्षात राहील. हा पुरस्कार केवळ एक सन्मानपत्र किंवा ट्रॉफी नाही; तो माझ्यासाठी जबाबदारीची नवी शिदोरी आहे. “हा माझ्या जिद्दीचा, मेहनतीचा आणि समाजाच्या ऋणात असण्याचा सुवर्णाक्षरांनी कोरलेला ठसा आहे.” हा पुरस्कार माझ्यासाठी एका नव्या प्रवासाची सुरूवात आहे, या पुढे कधी ही अपयशाचे ढग माझ्यावर दाटून आले, तरीही हा सन्मान मला नव्या आशेचा सूर्य नेहमीच दाखवत राहील. अंधाराच्या छायेतही हा पुरस्कार मला जिंकण्याची नवी जिद्द देईल. माझ्या समाजाने दिलेल्या या कार्यगौरव प्रेरणेचा मी सदैव ऋणी राहीन. त्याचबरोबर,माझ्या सर्व मित्रपरिवाराचे, तसेच माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे विशेष आभार! सोशल मीडियाद्वारे, फोन कॉलद्वारे, संदेशाद्वारे तसेच वेगवेगळ्या माध्यमांतून आपण दिलेल्या अमूल्य शुभेच्छांमुळे माझा हा आनंद द्विगुणित झाला. आपण वेळ काढून दिलेल्या प्रोत्साहनपर शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद! हे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहोत, हीच अपेक्षा.

जाहिरात

भव्य सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमात नाभिक समाजातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योग, आरोग्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत – डॉ. सुजय विखे पाटील, काका कोयटे, विठ्ठल लांडगे यांच्यासह, सयाजीराव झुंजार, दत्ताशेठ अनारसे, रामदास पवार, घनश्याम वाघ, विकास मदने, संजय गायकवाड, शांताराम राऊत, नारायण यादव, आप्पा सूर्यवंशी, अरुण सैदाणे, नंदकुमार मोरे आदींचा सहभाग होता. याशिवाय नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, बाळासाहेब व्यवहारे, सुनील गायकवाड, शशिकांत सोनवणे, काकासाहेब वाघमारे, अनिल कदम, संजय जायबाहार, वैभव बिडवे आणि माधव जाधव यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थिती लावली.

 एक प्रेरणादायी प्रवास सुरूच राहो!
सुदर्शन खडांगळे यांनी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी, सातत्याने केलेल्या मेहनतीने आणि समाजाभिमुख दृष्टिकोनातून मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे