ब्रेकिंग

सहकारी सोसायटयांना फार्मर प्रोड्युसर्स कंपनीचा दर्जा मिळण्यांसाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या मार्फत प्रयत्न करणार- विवेकभैय्या कोल्हे

सहकारी सोसायटयांना फार्मर प्रोड्युसर्स कंपनीचा दर्जा मिळण्यांसाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या मार्फत प्रयत्न करणार- विवेकभैय्या कोल्हे

 कोपरगांव – गांव पातळीवर सहकारी सोसायटया हया ग्रामिण विकासाच्या धमन्या आहेत, मुक्त खुल्या अर्थव्यवस्थेमुळे स्पर्धा सुरू झाली आहे तेव्हा सहकारी सोसायटयांना फार्मर प्रोड्युसर्स कंपनीचा दर्जा मिळुन त्यातुन शेतकरी वर्गाचे भले व्हावे, केंद्र व राज्यस्तरावरच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या मार्फत प्रयत्न करू असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांनी केले.  तालुक्यातील रांजणगांव देशमुख परिसरातील सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार गुरुवारी मंगलमुर्ती लॉन्स येथे करण्यात आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.  प्रारंभी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक अरूणराव येवले, अशोकराव औताडे, बाजार समितीचे माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, कोपरगांव तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष रामदास राहणे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष कैलास राहणे, निवृत्ती गोर्डे, प्रकाश गोर्डे, अमोल थोरात, बाळासाहेब गोर्डे, प्रमोद शिंदे, कानिफ गुंजाळ, सुनिल थोरात, अशोक म्हाळसकर, एकनाथ दरेकर, सिताराम कांडेकर, नानासाहेब कांदळकर, संजय सरवार, राजेंद्र गोरे, नितीन पाचोरे, नानासाहेब वर्षे, ज्ञानदेव थोरात, महेश थोरात, प्रल्हाद गाडे, रामनाथ गव्हाणे, आदि उपस्थित होते. श्री. विवेक भैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, जवळके येथे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची शाखा आहे मात्र परिसरातील शेतक-यांची संख्या मोठी असल्याने या शाखेवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो त्यासाठी रांजणगांव देशमुख येथे जिल्हा बँकेची शाखा नव्याने उघडावी अशी मागणी प्रलंबित असुन त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक स्तरावर प्रयत्न करू, इफकोने जगात सर्वप्रथम नॅनो तंत्रज्ञानावर लिक्वीड युरियाचे उत्पादन घेतले असून शेतक-यांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. शेतकरी राजाला प्रतिवर्षी ६ हजार रूपयांचा लाभ देवुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतक-यांना सर्वाधिक प्रतिवर्षी ९५ हजार कोटी रूपयाचे अर्थसहाय करत आहेत ही बाब मोठी आहे. जिल्हा सहकारी बँका शेतक-यांच्या आर्थीक उन्नतीसाठी सातत्याने काम करतात सहकारी सोसायटयांना आर्थीक पाठबळ देवून त्यांचे प्रश्न समजुन घेवून त्यावर मार्ग काढतात. केंद्र शासन ग्रामिण अर्थकारणाला पाठबळ देण्यासाठी सातत्याने वेगवेगळया निर्णयांची अमलबजावणी करत असते त्या माध्यमातुन या सोसायटयांना फार्मर प्रोड्युसर्स कंपनीचा दर्जा मिळाल्यास त्यातुन त्यांना अनेक आर्थीक उत्पन्नाचे स्त्रोत सापडतील आणि त्यातुन सक्षमतेचा मार्ग मिळेल त्यासाठी देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेवु व याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी गळ घालू असेही ते म्हणाले. याप्रसंगी संचालक अरुणराव येवले, कैलास राहणे, बाबासाहेब नेहे, नानासाहेब गव्हाणे, रामदास राहणे, बंडोपंत थोरात यांची भाषणे झाली, शेवटी राजेंद्र कोल्हे यांनी आभार मानले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे