सामाजिक
कोपरगांव नरगपालिकेने पावसाळयापुर्वी खडकी प्रभागातील कामे हाती घ्यावी-ताराबाई जपे
कोपरगांव नगरपालिका प्रशासनाने खडकी व समतानगर प्रभागातील विकास कामे पावसाळयापुर्वी हाती घेवुन पुर्ण करावी व येथील रहिवासीयांना दिलासा द्यावा या आशयाचे निवेदन माजी नगरसेविका ताराबाई गणपतराव जपे, संजय पवार, दिपक जपे आदिंनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले.
कोपरगांव नरगपालिकेने पावसाळयापुर्वी खडकी प्रभागातील कामे हाती घ्यावी-ताराबाई जपे
संपादक :- रवींद्र जगताप
कोपरगांव – या हंगामात पावसाळा लवकर आहे तसा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे तेंव्हा कोपरगांव नगरपालिका प्रशासनाने खडकी व समतानगर प्रभागातील विकास कामे पावसाळयापुर्वी हाती घेवुन पुर्ण करावी व येथील रहिवासीयांना दिलासा द्यावा या आशयाचे निवेदन माजी नगरसेविका ताराबाई गणपतराव जपे यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे दिले आहे. माजी नगरसेवक संजय कारभारी पवार, दिपक जपे आदि याप्रसंगी उपस्थित होते.खडकी प्रभागातुन वाहणा-या नाल्याची सफाई व खोलीकरण व्हावे, खडकी पुलाचे काम पुर्ण करून तो रहदारीस खुला करण्यात यावा, समतानगर भागातील निवीदा स्तरावरील रस्ते व गटारीची कामे पावसाळयापुर्वी करावी, खडकी गटारीचे काम तातडींने पुर्ण करावे, नगरपालिका शाळा कमांक ९ खडकी व भाग शाळा क्रमांक ९ येवला रोड या दोन्ही शाळेत मुरूम टाकुन पाण्याचा निचरा होईल अशा पध्दतींने सपाटीकरण्याचे काम करावे, मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करावा, अंतर्गत कच-याची स्वच्छता करून संपुर्ण खडकी प्रभागात जंतुनाशक फवारणी करावी आदि मागण्या या निवेदनात करण्यांत आल्या आहेत. श्रीमती ताराबाई जपे व संजय कारभारी पवार म्हणाले की, खडकी व समतानगर प्रभागात असणा-या असुविधाबाबत पालिकेच्या प्रत्येक मासिक तसेच सर्वसाधारण सभेत चर्चा करून नगराध्यक्ष व संबंधीत अधिका-यांना अपु-या कामाबाबत तकारी करून, ही कामे तातडींने पुर्ण करावीत म्हणून सातत्याने सुचना केलेल्या आहेत.या निवेदनावर सर्वश्री हाशम शेख, जितेंद्र दिवेकर, खंडु वाघ, युनुस शेख, राजुभाई शेख, अमजद शेख, मुनीर शेख, सुरेश कोंडके, सुनिल आदिक, विलास काटे, रविंद्र आधाने, विलास चव्हाणके, रामभाउ गुंजाळ यांच्या स्वाक्ष-या आहेत.



