कोपरगाव येथे कालकथित ताराआई मोरे यांच्या द्वितीय स्मरणार्थ सुगती रथाचे लोकार्पण…




कोपरगाव येथे कालकथित ताराआई मोरे यांच्या द्वितीय स्मरणार्थ सुगती रथाचे लोकार्पण…
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव – येथील मोरे परीवाराच्या वतीने ताराआई मोरे यांच्या द्वितीय स्मरणार्थ दि.२६ मार्च रोजी अंबिकानगर येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला भन्ते ऊपाली. (गंगापूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी भंतेजींनी भगवान गौतम बुद्ध ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची विधिवत पूजा मोरे परिवार कडून करून घेतली. तसेच कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजयराव वाजे यांच्या हस्ते सुगती रथाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.


यावेळी श्रीमती पिंगळे मॅडम यांनी ताराआईच्या जीवनावर प्रकाश टाकत आईने केलेल्या संसारासाठी कष्ट वेळप्रसंगी आईने गव्हाचा सर्वा वेचला. कोंबड्या, शेळी, गायी पाळल्या तसेच मेस देखील चालवली या सर्व त्यागातून मोठा मुलगा रावसाहेब मोरे(एम.एस.ई.बी. भुसावळ डिव्हिजन) व नितीन मोरे(एम. एन. सी. कंपनी सिंगापूर सॉफ्टवेअर इंजिनियर) म्हणून कार्यरत आहेत.आपल्या दोन मुलांचे उच्चशिक्षण चांगल्या पद्धतीने केले.गेल्या दोन वर्षांपूर्वी कोविडचा काळ चालू असताना आईचे दीर्घ आजाराने निधन झाले परंतु अंत्यविधीसाठी घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत रथ न मिळाल्याने आईला ॲम्बुलन्स मधूनच अंत्यविधी करण्यासाठी नेण्यात आले. तीच खंत दोन्ही भावांनी मनात बाळगून आईच्या द्वितीय स्मरणार्थ सुगती रथाचे लोकार्पण करण्याचे ठरवले. मॅडम मनोगत व्यक्त करत असताना उपस्थितांना देखील गहिवरून आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
युवराज गांगवे( अध्यक्ष कोपरगाव एकस सर्विसमन असोशियन कोपरगाव),
मारूती कोपरे (उपाध्यक्ष एक्स सर्विसमन असोशियन कोपरगाव), .
निबाळकर (सचिव ) (एक्स सर्विस मन असोशियन कोपरगाव), सिद्धार्थ मेहेरखांब (पत्रकार)
राज दिवेकर साहेब ,
भिमराज गंगावने साहेब,
अजय विघे (पत्रकार), सोनवणे सर ( पुणे),
एकस सर्विसमन असोशियन चे माझी सैनिक मित्र परिवार आप्तेष्ट उपस्थित होते.
आईच्या स्मरणार्थ सुगती रथ लोकार्पण सोहळा संपन्न झाला .तसेच दि.१ एप्रिल रोजी धम्ममेघ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भिक्खु आनंद सुमन सिरी यांना सुगती रथाच्या चाव्या चि.शौर्य नितीन मोरे व मोरे परिवार यांच्या हस्ते सुपूर्त केल्या. तसेच यापुढील काळात रथाला काही प्रॉब्लेम आलाच तिची देखील जबाबदारी मोरे परिवाराने घेतली व सुगती रथाचे लोकार्पण केले.यावेळी गणेश पवार,आनंद सोनपसारे साहेब, अरविंदजी विघे (माजी नगरसेवक) अनिल नवगिरे,दगुजी साबळे,अजय पाटील , विजय भातणकर, अशोक शिंदे, संजय दुशिंग,नाना रोकडे, संजय कांबळे, मनोज शिंदे, नितीन शिंदे,मयूर दुशिंग, बुद्धिस्ट यंग फोर चे अध्यक्ष विजय त्रिभुवन यांनी मोरे परिवाराचे अभिनंदन केले, यावेळी श्रमिकराज कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, धम्म मेक फाउंडेशन उक्कडगाव चे पदाधिकारी व बुद्ध धम्म प्रसारक मंडळ (ट्रस्ट) चे पदाधिकारी, तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच उपासक-उपासिकांनी मोरे परिवाराचे आभार मानले व अभिनंदन केले.समाजामध्ये एक नवीन उपक्रम राबवल्याबद्दल सर्व थरातून मोरे परिवाराचे कौतुक होत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ मेहरखांब साहेब यांनी केले.यापुढे अंत्यविधीसाठी सुगती रथ लागत असेल तर पुढील नंबर वर संपर्क साधावा.
भिकू आनंद सुमन सिरी 8605192995 ,
गणेश पवार 9763902644, नितीन मोरे 9833624208, अजय विघे 9890409343, विलास गवळी 9730104558, रावसाहेब मोरे 9830034962, अनिल नवगिरे 7498590570


