रामराव शिरसाट यांची उपनिरीक्षक पदावर बढती…….

रामराव शिरसाट यांची उपनिरीक्षक पदावर बढती…….
शिर्डी/-जिद्द ,मेहनत, प्रामाणिक कर्तव्याची दखल घेत टाकळी मानुरचे भुमिपुत्र सहायक फौजदार रामराव बाबासाहेब शिरसाट यांना नुकतीच पोलिस उपनिरीक्षक पदाची बढती मिळाली एका ऊसतोडणी मजुरांचा मुलगा आज मोठे यश मिळवले हे कौतुकास्पद आहे रामराव शिरसाट यांचे दहावीपर्यंत शिक्षण श्रीभवानी माता विद्यालय टाकळी मानुर येथे झाले1991मध्ये ते पोलिस दलात शिपाई पदांवर भरती झाले मागिल तीन वर्षांपासून ते साहयक फौजदार म्हणून अहील्यानगर येथे कर्तव्य बजावत होते तसेच वाहतूक शाखेचे नावलौकिक होण्यासाठी ते प्रयत्नशील असतं केसेस, दंड वसूल दंडात्मक कारवाई यातुनच वाहतूक व्यवस्था सुरळीत सामान्य माणसाची पोलिस खात्याकडे पाहण्याची समाधानकारक भावना व्यक्त होत आहे यापुर्वीही शिर्डी वाहतूक शाखेत, बाबळेश्वर महामार्ग वाहतूक शाखेत कार्यरत होते या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्याने त्याचा मित्रपरिवार आहे रामराव शिरसाट यांची उपनिरीक्षक पदाची बढतीची माहिती मिळताच शिरसाट यांचा सत्कार अभिनंदन शुभेच्छा वर्षाव होत आहे




