देश-विदेश

कोपरगाव नगरपरिषदेतर्फे घरोघरी जाऊन तिरंगा झेंडा विक्री करण्याचा अभिनव संकल्प

कोपरगाव नगरपरिषदेतर्फे घरोघरी जाऊन तिरंगा झेंडा विक्री करण्याचा अभिनव संकल्प

संपादक:- रविंद्र जगताप

 दिनांक १२ ऑगस्ट २०२३ पासून कोपरगाव नगरपरिषदेतर्फे शहरातील तीन भागात स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. शहरातील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे स्मारक चौक, चर्चसमोर आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ राष्ट्रध्वज विक्री स्टॉल सुरु करण्यात आलेले आहेत.  तसेच यावर्षी नगरपरिषदेने घरोघरी जाऊन तिरंगा झेंडे विक्री करण्याचा अभिनव संकल्प हाती घेतलेला आहे. त्यानुसार नगरपरिषदेच्या विविध भागात पथके करून प्रत्येकाच्या घरी जाऊन झेंडे विकण्यात येत आहे. तसेच प्रत्येक नागरिकांनी घरोघरी तिरंगा लावावा म्हणून जनजागृती करण्यात येत आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” म्हणजेच “माझी माती माझा देश” हे अभियान दिनांक ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जसे की शिलाफलक अनावरण,वसुधा वंदन,स्वातंत्र्यसैनिक व वीरांना वंदन,पंच प्रण शपथ, हर घर तिरंगा आणि ध्वजारोहण कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपल्या शहरामध्ये आपल्या माती विषयी जनजागृती,प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमिसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीरांचा सन्मान व्हावा याकरिता सदर अभियान राबविण्यात येत आहे.यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी शहरातील सर्व नागरिकांना राष्ट्रध्वज खरेदी करून दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवावा झेंडा लावावा, असे आवाहन करण्यात आले.




कोपरगाव येथे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हॉटेल वर छापा सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/gv1mOEN-8MI

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे