महाराष्ट्र

चासनळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

चासनळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद

चासनळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पा.चासनळी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरावके वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सहलीत शिवनेरी किल्ला, वडज धरण,लेण्याद्री, ओझर या स्थळांचा समावेश करण्यात आला होता.एसटी महामंडळाच्या बसने 52 विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद लुटला. शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले शिवनेरी किल्ला,शिवजन्मभुमी,छत्रपती शिवरायांचा पाळणा, शिवाई देवीचे मंदीर तसेच लेण्याद्री येथील प्रसिद्ध लेण्या गणपती दर्शन वडज धरण ,ओझर येथील प्रसिद्ध गणपती मंदिर पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. ओझर येथील गणपतीचे दर्शन करून प्रसादलयातील महाप्रसादाचा लाभ घेतला.बसमध्ये गाणी म्हणत नाचत गात गप्पा मारत मुलांनी एकदिवसीय सहलीचा मनमुराद आनंद घेतला.या सहलीमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.शैक्षणिक सहलीच्या यशस्वीतेसाठी सहल प्रमुख मुख्याध्यापक मच्छिंद्र सोनवणे सर, मिननाथ माळी सर,संतोष पारासूर सर,जयश्री मोगरे मॅडम,श्रीम. साबळे मॅडम, भीमा गोडे सर,सिताराम कचरे सर, पुष्पा चौधरी मॅडम, वंदना रोकडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे