महाराष्ट्र

मराठा समाज बांधवांचे उपोषण पालकमंत्री ना.विखे पाटील आणि मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत सुटले

मराठा समाज बांधवांचे उपोषण पालकमंत्री ना.विखे पाटील आणि मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत सुटले
संपादक:- रवींद्र जगताप
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील ५ दिवसांपासून कोपरगाव येथे आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून त्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी परमपूज्य श्री. रमेशगिरीजी महाराज व मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या हस्ते माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले.मराठा समाज बांधवांचे आरक्षण व अन्य मागण्यांच्या दृष्टीने उपोषण सुरू होते.मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून सरकार कडे मागणी करत आला आहे.नुकतेच कोपरगाव सकल मराठा समाज बांधवांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला होता त्यासाठी तालुक्यातून मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत होता.हे उपोषण ठोस आश्वासन मिळाल्या नंतर सुटले आहे. यावेळी उपोषणकर्ते अॅड. योगेशजी खालकर, अनिलजी गायकवाड, विनयजी भगत, जिल्हाधिकारी सिद्धारामजी सालीमठ, आमदार.आशुतोष काळे,पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार संदीपकुमार भोसले, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख आदींसह कोपरगाव तालुका सकल मराठा समाज समितीचे सदस्य, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात

वन नेशन व इलेक्शन फायदे तोटे जाणून घ्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

या कारणांमुळे मी राजकारणात प्रवेश केला सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
सत्य एक्सप्रेस न्यजच्या व्हाँटसाप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे