कोपरगाव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि कोपरगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विधार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न
कोपरगाव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि कोपरगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विधार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न
दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे अवचीत्य साधून कोपरगाव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि कोपरगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२२ मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विधार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता.

कोपरगाव नगरपरिषदेच्या मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.शांताराम गोसावी साहेब यांच्या अध्यक्षते खाली सदर गुणगौरव सोहळा पार पडला.या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव शहरातील प्रसिद्ध यशस्वी बांधकाम व्यवसायिक मा.श्री.प्रसाद नाईक साहेब ,अध्यक्ष केड्राई कोपरगाव,मा.श्री.विरेन अग्रवाल,अध्यक्ष रोटरी क्लब कोपरगाव असेच मा.श्री.काले साहेब उपस्थित होते.

या गुणगौरव सोहळ्या प्रसंगी ऊपस्थित गुणवंत विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करतांना श्री. प्रसाद नाईक साहेबांनी पुस्तकांचे वाचन करणे आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे याविषयी सांगितले.असेच आजच्या मोबाईलच्या युगात आपल्याला पुस्तकांचा विसर पडत चाललेला आहे तरी विध्यार्थ्यानी शालेय पाठ्यक्रमा व्यतिरिक्त देखिल वाचन केले पाहिजे असे मत मांडले.त्याच प्रमाणे मा. श्री.विरेन अग्रवाल साहेबांनी कोपरगाव नगर परिषदेच्या सुसज्ज अशा वाचनालयाचा सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे असे आव्हान केले.वाचन हे व्यक्ती जीवनात अत्यंत महत्वाचे असून वाचनामुळे व्यक्ती जीवनात सुसंस्कुतता येते असेही ते म्हणाले. मा.श्री.काले साहेबानी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना कोपरगाव नगर परिषदेच्या सुसज्ज अशा वाचनालयाचा सर्व विध्यार्थ्यांना मोफत लाभ घेता यावा अशी माफक मागणी मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक साहेबांकडे केली असता साहेबांनी ती मान्यही केली.

विध्यार्थी गुणगौरव सोहळ्या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक साहेबांनी सदरचा गुणवंत विध्यार्थी गुणगौरव सोहळा ही कोपरगाव नगरपरिषदेची परंपरा आहे.अशा कार्यक्रमांमुळे विध्यार्थ्याच्या मनात जिद्द तयार होते, त्यांची स्पर्धक वृत्ती वाढीस लागते आणि यातूनच भविष्यात चांगले अधिकारी प्रशासक आणि कर्तव्य दक्ष अधिकारी तयार होऊ शकतात.सदरचा गुणगौरव हा केवळ विध्यार्थ्यांचा नसून त्यांच्या पालकांचा आणि त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचाही आहे असे सांगितले.प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांकडे शहरात तसेच तालुक्यात अनेक असे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत यांचा देखिल गौरव सन्मान हा केला गेला पाहिजे म्हणजे चांगले आदर्श विध्यार्थ्यांना मिळतील आणि प्रेरणाही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.विध्यार्थी जीवनातील गौरव सन्मान हा विध्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरत असल्याचे त्यांनी व्यक्त केले.या पुढेही नगरपरिषदे मार्फत अशा गुणवंत विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ आयोजित केले जातील जेणे करून भावी विध्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात प्रेरणा मिळेल असेही गोसावी साहेब म्हणाले.याप्रसंगी उपस्थित विध्यार्थ्यानी आणि काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कोपरगाव नगरपरिषदेचे मनपूर्वक आभार मानले.या प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदे मार्फत यशस्वी पणे राबविल्या जात असलेल्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत उपस्थितांनी स्वच्छतेची शपत घेण्यात आली.वसुधरेचे सौरक्षण हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.आणि हि जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी पाळलीच पाहिजे असा या शपतेचा उद्देश होता.तसेच याच गुणगौरव सोहळ्या प्रसंगी एम.के.आढाव शाळेच्या चार विध्यार्थीनी सिंधखेडराजा या ठिकाणी नुकत्याच झालेल्या जंप रोप स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविल्यामुळे आणि त्यापैकी दोन विध्यार्थीनींची महाराष्ट्र संघात निवड झाले बद्दल त्यांचाही या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विध्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन कोपरगाव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि कोपरगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.शेलार,थोरात आणि राक्षे ताई यांनी केले.कार्यक्रमाचे प्रस्थाविक नगरपरिषदेचे कर्मचारी श्री.रविंद्र वाल्हेकर यांनी केले.सूत्र संचलन एम.के.आढाव शाळेच्या शिक्षिका गवांदे मॅडम यांनी केले.आणि आभार प्रदर्शन रामनाथ जाधव यांनी केले.या प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी अधिकारी तसेच गुणगौरव स्वीकारण्यासाठी विध्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.


