महाराष्ट्र

कोपरगाव मतदारसंघातील २४ गावातील जलसंधारण कामांसाठी ६.१३ कोटींचा निधी मंजूर व प्रशासकीय मान्यता – आ. आशुतोष काळे

कोपरगाव मतदारसंघातील २४ गावातील जलसंधारण कामांसाठी ६.१३ कोटींचा निधी मंजूर व प्रशासकीय मान्यता – आ. आशुतोष काळे
कोपरगाव – कोपरगाव मतदार संघातील ओढे-नाले खोलीकरण व दुरुस्ती कामांकरीता निधी मिळावा यासाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून मतदार संघासाठी ६.१३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना प्रशासकीय मान्यता देखील दिली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मतदार संघातील जल संधारणाच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी शासन दरबारी सादर केलेल्या प्रस्तावास महायुती शासनाने मान्यता देताना मतदार संघातील २४ गावांतील ओढे-नाले खोलीकरण व दुरुस्ती आदी कामासाठी एकूण ६.१३ कोटी निधीस मंजूरी  देण्यात येवून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या निधीतून मतदार संघातील बोलकी (९ लक्ष ८१ हजार), ब्राम्हणगाव (२२ लक्ष ७१ हजार), धारणगाव (२७ लक्ष), चांदगव्हाण (७ लक्ष ३२ हजार), जेऊर पाटोदा (१५  लक्ष १७ हजार), करंजी (३२ लक्ष २६ हजार), खिर्डी गणेश (२० लक्ष ९२ हजार), कोकमठाण (५७ लक्ष ७१ हजार), मळेगाव थडी (३८ लक्ष ४३ हजार),  मुर्शतपूर (७ लक्ष ८ हजार) सडे (२४  लक्ष १९ हजार), रवंदे (१६ लक्ष ५६  हजार), शिंगणापूर (२४ लक्ष १३ हजार), सोनारी (११ लक्ष  ५ हजार), टाकळी (१० लक्ष ५० हजार), येसगाव (१२ लक्ष ६५  हजार), नाटेगाव (७ लक्ष ५६ हजार), संवत्सर (९६ लक्ष ४८ हजार), सांगवी भुसार (५२ लक्ष ५ हजार,) माहेगव देशमुख (१८ लक्ष ५१ हजार), सुरेगाव (२१ लक्ष १८ हजार), चासनळी (९ लक्ष ९९ हजार), कोळपेवाडी (७ लक्ष ५८ हजार)  व शिंगवे (६२ लक्ष ८ हजार) आदी गावांतील ओढे-नाले खोलीकरण तसेच रुंदीकरण कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे की, कोपरगाव मतदार संघातील गावांमध्ये पावसाळयामध्ये पावसाचे वाया जाणारे पाणी अडविले जावे, भूगर्भाची पाणी पातळी वाढली जावी जेणेकरून उन्हाळयामध्ये विहीरीचे पाणी कमी होणार नाही. तसेच जिरायत शेतीचे रुपांतर बागायत शेतीमध्ये व्हावे यासाठीओढे-नाले खोलीकरण व दुरुस्ती आदी कामाची नागरिकांची मागणी होती. यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून निधी उपलब्ध झाला. यापुढेही मतदार संघातील उर्वरीत गावातील जल जलसंधारणच्या कामासाठी नागरिकांच्या मागणी नूसार निधी मिळवू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.मतदार संघाच्या जलसंधारणच्या कामासाठी ६.१३ कोटी निधी मंजूर केल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड यांचे आभार मानले आहे. तर या चोवीस गावासह मतदार संघातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे