अहमदनगर जिल्ह्यास डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे:- गौतमराव बनसोडे
अहमदनगर जिल्ह्यास डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे:- गौतमराव बनसोडे
संपादक:- रविंद्र जगताप
अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण होणार असे वृत्त प्रसिध्दी माध्यमातून समोर येत आहे.डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक राज्यात जिल्हयाला नावे आहेत.महाराष्ट्र राज्यातही डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे एखादा जिल्हा असावा. असे मत घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्यात सभा देखील घेतलेल्या आहे.त्यामुळे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक संदर्भ अहमदनगर जिल्ह्याला जोडलेला आहे.अहमदनगर जिल्ह्याचे विभाजनाची मागणी अनेक वर्षापासून आहे.अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करुन दोन जिल्हे होतील. दक्षिण अहमदनगरचे नामकरण करुन अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे व उत्तर नगर जिल्हयाला डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांनी मागणी केली आहे.




