भविष्य काळात निष्ठावंत शिवसैनिक शिंदे गटाला त्यांची जागा दाखवून देतील. महेश कुलकर्णी
भविष्य काळात निष्ठावंत शिवसैनिक शिंदे गटाला त्यांची जागा दाखवून देतील. महेश कुलकर्णी
केंद्र सरकारच्या मेहरबानीने लोकशाही चा गळा घोटून निवडणुक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह शिवसेनेच्या बंडखोर गटाला अर्पण केले. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो.येणार्या सर्व निवडणुकीत पक्षप्रमुख .माजी लोकप्रिय मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे .युवासेनाप्रमुख युवासम्राट माजीमंत्री आ अदित्यसाहेब ठाकरे .हेच आमचा पक्ष व चिन्ह राहील . शिंदे गटाला शिवसैनिक व जनता निश्चितच त्यांना त्यांची जागा दाखवून देतील असा इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे. यांचे खंदे कट्टर निष्ठावंत शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी दिला. शिवसेना नेते सुहासराव वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली पुणतांबा शहर शिवसेना अभेद्य असुन .आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत उध्दवसाहेब ठाकरे. अदित्यसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे सांगुन 1966 साली शिवसेनेची स्थापना करून बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानसाचा स्वाभिमान जागवण्याचे काम केले. तसेच देशप्रेम. राष्ट्रभक्ती चे धडे देऊन युवाशक्तीला प्रेरीत करून .समाजातील वंचित गोरगरीब गरजू घटकांकातील अनेक होतकरू युवक युवती यांचे संघटन उभे करून अनेक आमदार . खासदार .नामदार . मंत्री .मुख्यमंत्री. लोकसभा सभापती. महापौर नगरसेवक घडवण्याचे कार्य केले. परंतु काहीनीं शिवसेना पक्षा वरच घाला घालुन पक्ष फोडण्यासाठी साम दाम दंड भेदाचा वापर केला. चार वेळा आमदार दोन वेळा मंत्री मुलगा दोनदा खासदार .पक्षात महत्वाचे पदे. एवढे देऊन ही यांनी उध्दवसाहेब ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसला. अशा या विकृतीला आगामी काळात निष्ठावंत शिवसैनिक व जनता जनार्दन त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय स्वस्त बसणार नाही .असे शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी सांगितले आहे. तसेच या प्रसंगी उपशहरप्रमुख नवनाथ वायकर. बालशिवसैनिक चि उत्कर्ष महेश कुलकर्णी हे उपस्थित होते.




