सामाजिक

अल्पसंख्याक लोणारी समाजाला लोकसंख्या प्रमाणात विधानसभा जागा द्याव्यात:-सौ.सोनल चोरगे

अल्पसंख्याक लोणारी समाजाला लोकसंख्या प्रमाणात विधानसभा जागा द्याव्यात:-सौ.सोनल चोरगे

कोपरगाव प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेद्रभाई मोदी
मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे तसेच उपमुख्यमंत्री यांना अल्पसंख्याक लोणारी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभा विधान परिषदे लोकसभा आणि राज्यसभेवर नेतृत्वाची संधी मिळण्या बाबत निवेदन सामाजिक कार्यकर्त्या सौ.सोनल चोरगे(लोणारी ) इमेल ने पाठवले आहे निवेदनात पुढे म्हंटले आहे की संविधानाने सर्वांना नेत्वृत्व करण्याचा समान अधिकार दिला असला तरी पण आता काही वर्षापुर्वी राजकिय ओ बी सी आरक्षण हे उच्च न्यायालयाने रद्द केले या निर्णयाची फेर विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे

जाहिरात

ओ बी सी आरक्षण नसल्याने व होते तरी जे अल्प संख्याक समाज आहे जसे लोणारी महादेव कोळी जंगम साळी कैकाडी समाज सोनार न्हावी परीट कुंभार गोसावी वंजारी लभान समाज वासुदेव समाज इ.अनेक प्रवागातील अल्पसंख्याक समाज या समाजावर बहुतांश वेळा अत्याचार जर झाले तर न्याय मिळवण कठीण होतं मंग त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळणं तर दुरापास्त आहे महाराष्ट्रात असे वंचित पिढीत उपेक्षित अनेक छोट्या छोट्या समाजांचा कुठच प्रतिनिधी नसल्याने त्यांना नेतृत्व करण्यासाठी व न्यायासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आणि यातील अनेक समाजांनी अक्षरक्षा देशाचा ७७ वा स्वातंत्र्य उत्सव साजरा करत असतांना कधी नेतृत्व केले नाही आणि या समाजातील एखाद्या व्यक्तीला ती संधी मिळालीच तर अल्प असंख्याकांना पराकोटीचा त्याग करावा लागतो आणि या त्यागयुक्त संघर्षात तो थकुन परत नेतृत्व करण्याची हिंमत करत नाही हि वस्तु स्थिती आहे तसंच लोणारी समाजाचे झाले आहे आधुनिकीकरणाच्या काळात पारंपरिक व्यवसाय लयाला गेले आणि रोजगाराच्या संधी हुकल्या आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाला असल्याने जगण्याची परवड होते तिथं नेतृत्व कधी करणार आता महाराष्ट्र सरकारने लोणारी समाज महामंडळ स्थापन करणार असा निर्णय घेऊन जो या उपेक्षित वंचित पिढीत समाजाला तिळशं न्याय दिला आहे खरा पण न्याय तेव्हाच होईल जेव्हा अल्प संख्याक लोणारी समाजाला लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषदेत लोकसंख्येच्या प्रमाणात नेत्वृत्व व समाजाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल म्हणुन विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा येथे लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देण्यात याव्या प्रत्येक पक्षाला उद: विधानसभा २८८ जागेत लोणारी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारी जागा देऊन नेतृत्वाची भरीव संधी देण्यात यावी असा निर्णय व्हावा अशी हि विनंती पर देत निवेदनात अंती तसेच हा निर्णय अल्पसंख्याक लोणारी समाजाला न्याय देणारा आहे तेव्हा आमची मागणी विचार व्हावा असे कै.वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या सौ.सोनल यांनी केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे