सावळी विहीर फार्म जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चिमुकल्यांचे स्वागत.
सावळी विहीर फार्म जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चिमुकल्यांचे स्वागत.
संपादक :- रविंद्र जगताप




सावळी विहीर प्रतिनिधी/- राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील सावळीविहीर फार्म जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळापुर्व तयारी मेळावा आयोजित केला होता तसेच शाळा प्रवेशोत्सव दिनाच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी नविन विद्यार्थ्यांना चक्क वाहनातून मिरवणूक काढण्यात आली पारंपारिक वाद्यांच्या गजरात शाळेत चिमुकल्यांचे स्वागत केले प्रभातफेरी झाली शाळेत विविध प्रकारचे फलक लावण्यात आले होते तसेच चिमुकल्यांच्या पसंती लक्षात घेऊन विविध प्रकारचे आकर्षक शालेय वस्तूंची या ठिकाणी मांडणी केली होती शाळेत सजावट करण्यात आली होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नविन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके तसेच गणवेश वाटप करण्यात आले चिमुकल्यांना खाऊं देण्यात आला तसेच शाळेत अनंत सुरळे सामाजिक कार्यकर्ते याच्याकंडुन पंखा देण्यात आला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदिप घोलप यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी साईनाथ झिंजाड विजय खरात अनंत सुरळे जालीदर खरात अलकाताई सुरळे देवकरताई गांगुर्डेताई मोठ्या संख्येने पालकवर्गाची उपस्थिती होती शाळेचे शिक्षक योगेश बोरसे सर यांनी आभार मानले

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS




