प्रा. डॉ. कमलाकर गायकवाड यांना डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम नॅशनल अकॅडमिशियन पुरस्कार २०२६ प्राप्त

प्रा. डॉ. कमलाकर गायकवाड यांना डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम नॅशनल अकॅडमिशियन पुरस्कार २०२६ प्राप्त
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध संशोधक मार्गदर्शक प्रा. डॉ.कमलाकर गायकवाड यांना डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम नॅशनल अकॅडमिशियन पुरस्कार २०२६ प्राप्त झाला असून शिक्षण, संशोधन, साहित्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार वेलरेड फाउंडेशन, वेस्ट बंगाल या नामांकित संस्थेचे डायरेक्टर श्री. रासबिहारी कायेत यांचे मार्फत देण्यात आला. ही संस्था मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, नीती आयोग, एनसीटीदिल्ली, एमएसएमइ उद्यम आणि गवर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने कार्यरत आहे. त्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.

डॉ. गायकवाड हे महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नामपूर, ता. बागलाण, जि. नाशिक येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनाबरोबरच संशोधन, साहित्यिक लेखन, विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास उपक्रम,राष्ट्रीय चर्चासत्रे, कार्यशाळा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्याचप्रमाणे ते इंग्रजी भाषा व साहित्य, शैक्षणिक लेखन, संशोधन, सॉफ्ट स्किल्स, हार्ड स्किल्स, संवादकौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उच्च शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांत सातत्याने कार्य करीत आहेंत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची व्याप्ती व संशोधनविषयक योगदानाची विविध स्तरांवर दखल घेण्यात आलेली आहे. डॉ. गायकवाड यांनी विविध पुस्तके प्रकाशित केली असून साहित्यिक व संशोधनपर लेखनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना मार्गदर्शन केले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये संसाधन व्यक्ती (Resource Person), संशोधक, लेखक आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून योगदान दिले आहे.‘ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ज्ञान, संशोधन,नवोपक्रम आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांना प्रेरणास्थान मानून शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला मिळालेली ही राष्ट्रीय पातळीवरील दखल महत्त्वपूर्ण मानली जात आहे.या पुरस्काराबद्दल डॉ. गायकवाड यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. उज्जैन कदम, उपप्राचार्य प्रा.डॉ. अनिल सावळे, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. युवराज भामरे, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, संशोधक, मित्रपरिवार आणि विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. “ज्ञान,संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणे हीच या सन्मानाची खरी प्रेरणा आहे,” अशी भावना डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केली.

संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JcX8YoNk9gs6W6YGtE20ZI?s=cl&p=a&ilr=0&amv=2
बातम्यासाठी 9175751349 हा नंबर आपल्या व्हाटसाँप ग्रुपला अँड करा
संपादक रवींद्र जगताप


