अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी काही तासात जेरबंद !
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी काही तासात जेरबंद !
कोपरगाव :-दिनांक १६/०४/२०२४ रोजी अल्पवयीन पिडीत मुलगी वय १४ वर्ष ९ महीने ७ दिवस हिने तिचे आई सोबत्त कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला येऊन फिर्यादी दिली की, त्यांच्या ओळखीचा तौसिफ कलीम बागवान वय २८ वर्ष धंदा चालक व फळविक्रेता रा.मावळा चौफुली, गांधीनगर कोपरगाव ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर याने अल्पवयीन पिडीत मुलीचे घरातील मोबाईलवर वारंवार फोन करुन अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देवुन आरोपीने आणलेल्या गाडीत बसवुन जेऊर पाटोदा शिवारात निर्जनस्थळी घेवुन जाऊन अल्पवयीन मुलगी हिच्यावर बळजबरीने अत्याचार केला असले बाबत पिडीत मुलगी हिचे फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं.१९५/२०२४ भा.द.वि कलम ३७६,२७६ (२),५०६ सह लैंगिक अपरार्धापासून बालकांचे संरक्षण अधिनीयम २०१२ चे कलम ४,८ प्रमाणे दिनांक १६/०४/२०२४ रोजी ०१.५५ वाजत्ता दाखल करुन पुढील तपास सपोनि मयुर भामरे यांचेकडे देण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन गा.श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, . श्री. वैभव कलुबर्गे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, मा.श्री. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तात्काळ आरोपीचे शोध कामी २ वेगवेगळी तपास पथके तयार करून रवाना करण्यात आले होते. सदर गुन्ह्यातील आरोपी तौसिफ कलीम बागवान हा जामखेड येथे असले बाबत गुप्त बातमीदारार्माफत बातमी मिळाल्याने तात्काळ एक तपास पथक जामखेड येथे पोहचुन गुन्ह्यातील आरोपी तौसिफ कलीग बागवान याला काही तासातच तपास पथकातील पो. हे. कॉ बाबासाहेब कोरेकर, पो.कॉ गणेश काकडे, पो.कॉ सुंबे, पो.कॉ राम खारतोडे यांनी जामखेड पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेवून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला हजर केले. गुन्ह्यात्तील आरोपी तौसिफ कलीग बागवान रा. मावळा चौफुली, गांधीनगर कोपरगाव ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर यास अटक करुन पोलीस कस्टडी रिमांड करीता मा.विशेष तथा अति. जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने अटक आरोपी यास दिनांक १९/०४/२०२४ रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजूर केली आहे.



सदर आरोपीला काही तासातच अटक करण्याची कामगिरी मा.श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री. वैभव कलुबमें अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, मा. श्री. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिक्कारी शिर्डी विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो. नि. प्रदिप देशमुख, सपोनि विश्वास पावरा, सपोनि मसुर भामरे, पोसई रोहीदास ठोंबरे, पो. हे. क्कों बालासाहेब कोरेकर, पो.को गणेश काकडे, पो.कॉ सुंबे.पो.कॉ राम खारतोडे, पोकों. भांगरे, चालक पो. की जाधव यांच्या पथक्काने केली असुन पुढील तपास सपोनि मयुर भामरे हे करीत आहेत


