ब्रेकिंग

के. जे. सोमैया महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन

 

डॉ. श्याम साळुंके उदघाटन प्रसंगी उद्बबोधन करतांना सोबत मान्यवर

डॉ. सोबत कुमार दिगल उदघाटन प्रसंगी उद्बबोधन करतांना सोबत मान्यवर

के. जे. सोमैया महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव – के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव मध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य मंडळ व उद्योजकता विकास केंद्राचे उद्घाटन रमादेवी महिला विद्यापीठ भुवनेश्वर ओडिसा येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. साबत कुमार दिगल व कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव च्या अ.र.भा. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्याम साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाची वैशिष्ट्ये व गुणवत्ता उंचावण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती मान्यवरांना करून दिली.
कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. स्वागत कुमार यांनी कोविड-19 नंतरचे वाणिज्य शिक्षण या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानात कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर वाणिज्य विषयाचे शिक्षण घेतल्यानंतर व्यवसायाच्या व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानुसार व्यवसायाच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांनी वाणिज्य शिक्षणामधील विविध तंत्रे आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम व प्रकल्प राबवत आहे, हे बघून आनंद झाला असे गौरवोदगार काढले .दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. श्याम साळुंखे यांनी ‘बिझनेस इनक्युबॅशन व उद्योजकता विकास’ या विषयावर व्याख्यान देताना विद्यार्थ्यांनी व्यवसायाच्या नवकल्पना विकसित करून बिजनेस इनक्युबॅशन च्या माध्यमातून नवीन स्टार्ट अप सुरू करून उद्योजक बनले पाहिजे. यासाठी जिद्द ठेवून काम केले पाहिजे, क्षमता निर्माण केल्या पाहिजे. त्याचबरोबर नोकरीच्या मागे न धावता उद्योजक बनले पाहिजे असे उद्गार काढले .वाणिज्य विभाग अंतर्गत वाणिज्य मंडळ व उद्योजकता विकास केंद्र राबवत असलेले विविध उपक्रमांची माहिती वाणिज्य विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस आर पगारे यांनी उपस्थितांना करून दिली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. रवींद्र जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. एस. एल. अरगडे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. धनवटे, प्रा आव्हाड, प्रा. गुंजाळ, प्रा. रणधीर, प्रा. माळवदे हे उपस्थित होते.वाणिज्य मंडळ राबवित असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे, सचिव एड. संजीव दादा कुलकर्णी व संचालक श्री. संदीप रोहमारे यांनी केले व भावी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे