महाराष्ट्र

समय सूचकतेने आपदा परिस्थिती हाताळा… – सुशांत घोडके

समय सूचकतेने आपदा परिस्थिती हाताळा…
– सुशांत घोडके

जिल्ह्यातील ५७ एन. सी. सी. कॅडेट १५० प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कार्यशाळा

आपत्कालीन परिस्थितीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्टंटबाजीच्या मोहात न पडता प्रशिक्षणातील ज्ञानाचा सदुपयोग करा. तसेच समयसूचकता ठेवून परिस्थिती हाताळण्याचे आवाहन स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले.जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते, आपत्ती व्यवस्थापन कार्यकारी अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली “युवा आपदा मित्र प्रशिक्षण अभियान” सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून कोपरगांव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूल येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील ५७ एन. सी. सी. कॅडेट १५० प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण सुरु आहे. या प्रशिक्षणात आपत्ती व्यवस्थापनात समन्वयाचा अनुभव असलेले स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी भुकंप, पूर, वीज, आग यासह नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्ती काळात परिस्थिती हाताळतांना करावयाचे प्राथमिक नियोजन बाबत माहिती सांगितली. तसेच विद्यार्थींशी संवाद साधून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.प्रशिक्षण वर्गाचे अधिकारी नायब सुभेदार दिपक सिंग, कॅप्टन एस. पलांडे, हवालदार संदिप वानखेडे यांचेसह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे