ब्रेकिंग

के.जे.सोमैया महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

के.जे.सोमैया महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नुकतीच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उदघाटन पोलीस उपनिरीक्षक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा.विजय सरवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. विजय ठाणगे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मा. विजय सरवार यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेंची माहिती देतांनाच महाविद्यालयीन शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता व क्षमता ओळखून प्रचंड जिद्दीने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे असे सांगितले.  सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास यश निश्चित मिळते असेही त्यांनी यावेळी नमूद केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो.विजय ठाणगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्पर्धा परीक्षा  विभागाचे समन्वयक डॉ. व्ही. एस. साळुंके यांनी प्रास्तविकात मान्यवरांचा परिचय करून देतानांच या कार्यशाळेचा उद्देश नमूद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र जाधव यांनी तर आभार प्रा.सदाशिव नागरे यांनी मानले. सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे