अखिल भारतीय सरपंच महासंघ कोपरगाव तालुकाध्यक्षपदी जालिंदर चव्हाण!!
अखिल भारतीय सरपंच महासंघ कोपरगाव तालुकाध्यक्षपदी जालिंदर चव्हाण!!
कोपरगाव प्रतिनिधी तालुक्यात जेऊर कुंभारीचे उपसरपंच जालिंदर रावसाहेब चव्हाण यांची अखिल भारतीय सरपंच महासंघाच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांनी कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जेऊर कुंभारी उपकेंद्रात लसीकरण सुविधा उपलब्ध करून सर्व नागरीकांना लसीकरण मिळावे यासाठी मेहनत घेतली.
अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर कुंभारी गावातील नागरीकांच्या येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे, जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीच्या माध्यामातुन घरकुलासाठी येणाऱ्या समस्या सोडवणे, गावातील तरुण वर्गाच्या मदतीने जेऊर कुंभारी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा करणे, सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच पुढाकार, गोरगरीबांचे प्रश्न मार्गी लावणे, पौराणिक मंदिर परीसर स्वच्छ करणे, गुणवंत विद्यार्थी गौरव, गावातील रस्ते दुरूस्ती करण्यासाठी आंदोलन असे अनेक समाजीक कामे त्यांनी केली आहेत. ग्रामीण चळवळीतील विकासाची साथ देण्यासाठी पंचायतराज मधील ग्रामपंचायत स्तरावरील सर्व प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी आज त्यांना अखिल भारतीय सरपंच महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनोद किशोर वहाडणे यांच्या हस्ते अखिल भारतीय सरपंच महासंघाच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल जेऊरकुंभारी परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून परिसरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.



