कोपरगावात नागरिकाचा संताप; ‘रस्ता नाही तर वाढीव घरपट्टी का भरावी?’

कोपरगावात नागरिकाचा संताप; ‘रस्ता नाही तर वाढीव घरपट्टी का भरावी?’
कोपरगाव | प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील वेदिका शोपीज मागे, खंदक नाला, मेन रोड परिसरातील रहिवासी मयूर नारायण आव्हाड यांनी नगरपरिषद प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध नोंदविला आहे.मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील अनेक भागांत डांबरी रस्ते, काँक्रीट रस्ते तसेच फुटपाथवर पेव्हर ब्लॉकची कामे करण्यात आली. मात्र त्यांच्या घरासमोरील रस्ता आजही विकासापासून वंचित असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.”माझ्या घरासमोरचा रस्ता अद्यापही विकसित करण्यात आलेला नाही. मूलभूत सुविधा न देता वाढीव घरपट्टी व इतर करांची वसुली करणे योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.याप्रकरणी त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेस निवेदन दिले असुन आम्हाला दळणवळण करण्यासाठी रस्ता नाही,अनाधिकृत ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतोय,तसेच रस्तयावर विजेचे पथदिवे नाही अशा अनेक समस्या त्यांनी मांडल्या आहेत .रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे, अन्यथा वाढीव घरपट्टी व इतर कर आकारणीचा निषेध करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.




संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा



