सुजित झोडगे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार

सुजित झोडगे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार
हिंगोली : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेच्या सन 2025-26 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुजित झोडगे (LDM, हिंगोली) यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त आणि उद्योग मंत्रालयाचे मुख्य सचिव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सुजित झोडगे यांना उत्कृष्ट कार्याची दखल घेत विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.CMEGP योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे रोजगारनिर्मितीला चालना देणे, लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.या राज्यस्तरीय गौरवाबद्दल विविध स्तरांतून सुजित झोडगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा



