ब्रेकिंग

कोपरगावचे भूमीपुत्र आदिनाथ ढाकणे यांची जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत नदी प्रहरी पदी  निवड

 

कोपरगावचे भूमीपुत्र आदिनाथ ढाकणे यांची जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत नदी प्रहरी पदी  निवड

-संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते शासनाच्या चला जाणूया नदीला या महत्त्वाच्या प्रकल्पाचे अगस्ती या नदीचे समन्वयक आदिनाथ ढाकणे यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान २.० मध्ये चला जाणूयां नदीला या नदी प्रहरी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात

ढाकणे हे प्रसिद्ध सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीची गेल्या २२८ आठवड्यापासून आपल्या गोदामाई प्रतिष्ठान मार्फत युवकांना एकत्र करत गोदावरी नदी किनाऱ्यांची स्वच्छता करत मिळेल तिथे वृक्षारोपण करत विविध सामाजिक उपक्रमातून नदी स्वच्छतेचे महत्व पटवून देत असून त्यांच्या या अप्रतिम कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचे मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियान २.० मध्ये नदी प्रहरी म्हणून निवड करण्यात आल्याने कोपरगावच्या शिरपेचात आदिनाथ ढाकणे यांच्या रूपाने मानाचा तुरा रोवला गेला आहे जलयुक्त शिवार अभियान २.० हे विविध योजनांच्या अभिसरणातून राबविण्यात येत असून त्याबाबत शासन निर्णय ३ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व नद्यांना अमृतवाहिनी करण्यासाठी नदी संवाद यात्रा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहेत सदर यात्रेसाठी व नद्यांचा अभ्यास करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक १४ ऑक्टोबर च्या शासन निर्णयानुसार समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये नदी प्रहराचा समावेश करण्यात आला असून या नदी प्रहरामध्ये जलयुक्त शिवार अभियान २.० मधील नद्यांना प्राधान्याने नदी संवाद यात्रेमधील छोट्या नद्या, नाले आणि तलाव यांच्या उपचारांना आणि गाळ काढण्याचे कामाना प्राधान्य देण्यात येणार आहे.सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे