आरोग्य व शिक्षण

शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांसह बा.य.ल. नायर हॉस्पिटल मुंबई सेंट्रल येथे हॉस्पिटल च्या अधिष्ठाता डॉ.प्रवीण राठी  यांची विविध समस्या सोडविण्यासाठी घेतली भेट

शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांसह बा.य.ल. नायर हॉस्पिटल मुंबई सेंट्रल येथे हॉस्पिटल च्या अधिष्ठाता डॉ.प्रवीण राठी  यांची विविध समस्या सोडविण्यासाठी घेतली भेट

संपादक:- रविंद्र जगताप

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ.शुभाताई राऊळ, कार्याध्यक्ष डॉ.किशोरजी ठाणेकर यांच्या सूचनेनुसार दि.13/12/2022 रोजी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांसह बा.य.ल. नायर हॉस्पिटल मुंबई सेंट्रल येथे हॉस्पिटल च्या अधिष्ठाता (डीन) डॉ.प्रवीण राठी सर यांची भेट घेऊन रुग्णालयात रुग्णांना येणाऱ्या विविध अडीअडचणी उदा. हॉस्पिटल मधील गेल्या तीन महिन्यापासून बंद असलेल्या सिटी स्कॅन मशीन मुळे रुग्णांना होणारा प्रचंड त्रास व एम.आर.आय बद्धल रुग्णांना येणाऱ्या अडचणी लवकर न मिळणाऱ्या तारखा, ब्लड बँक मध्ये येणाऱ्या अडचणी, अस्थिव्यंग विभागात रुग्णांना येणाऱ्या अडचणी, ओ.पी.डी.विभगा पासून रुग्णांना मुख्य इमारतीत आणण्याच्या चिंचोळ्या व गर्दी असलेल्या मार्गामुळे येणाऱ्या अडचणी तसेच हॉस्पिटल मध्ये शिकाऊ डॉक्टर व कर्मचारी यांच्या कडून रुग्णांना मिळणारी वागणूक व इतर विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले तेव्हा सिटी स्कॅन बद्धल असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करू व बाकीच्या. अडचणींवर लवकरच तोडगा काढून लवकरच दूर करू असे आश्वासन डीन सरांकडून देण्यात आले तसेच त्यावेळी संघटने च्या वतीने वेळोवेळी रुग्णांना मदत करणाऱ्या डीन डॉ.राठी सर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन शिव आरोग्य सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी त्याप्रसंगी संघटनेचे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक श्री.अमोल वंजारे,मुंबई जिल्हा समन्वय सचिव सौ.ज्योतीताई भोसले,सौ.सुप्रिया ठोंबरे पाटणे,शाखाप्रमुख श्री.हेमंत कदम,मुंबई अध्यक्ष डॉ.प्रसाद पवार,उपनगर(पू) सहसमन्वयक श्री.प्रकाश वाणी,मुंबई उपनगर (पू) समन्वय सचिव श्री.शिवाजी झोरे,घाटकोपर विधा.समन्वय सचिव श्री.सिद्धेश मोहिरे,घाटकोपर पश्चिम विधा.समन्वयक श्री. विनायक कानसकर,भांडुप पश्चिम विधा.समन्वय सचिव श्री.प्रवीण ढवळे तसेच श्री.हितेश गायकवाड, श्री.दत्तराज आंब्रे,श्री.किशोर भिलारे,श्रीसुहास परब, श्री.लितेश केरकर,श्री.साक्षात म्हात्रे,श्री.नंदकुमार बागवे,अंजली भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे