सामाजिक

श्री कालिका देवी मंदिर संस्थान, नाशिक वतीने उत्तर महाराष्ट्रातील पत्रकार लेखक यांचे कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री.सुरेशजी भटेवरा यांचे शुभहस्ते श्री. सुशांतजी घोडके सर यांचा विशेष गौरव…

श्री कालिका देवी मंदिर संस्थान, नाशिक वतीने उत्तर महाराष्ट्रातील पत्रकार लेखक यांचे कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री.सुरेशजी भटेवरा यांचे शुभहस्ते श्री. सुशांतजी घोडके सर यांचा विशेष गौरव…

संपादक:- रवींद्र जगताप

श्री कालिका देवी मंदिर संस्थान, नाशिक आयोजित पन्नकार दिना निमित्त कै. कृष्णराव पाटील कोठावळे उत्तर महाराष्ट्र पत्रकार सत्कार सोहळा शुक्रवार दि. ५ जानेवारी २०२४ रोजी श्री कालीका मंदिर सभागृह, जुना आग्रा रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. यात गोदातीर ईतिहास संशोधनात भरीव योगदान देणारे लेखक, पत्रकार श्री. सुशांत घोडके सर यांचा कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचे शुभहस्ते विशेष सन्मान देवून गौरवण्यात आले आहे. “उपासनेतील चंद्रावर ‘इस्रो’ यानाचा नवा अध्याय…” या लेखाचा विशेष गौरव करण्यात आला आहे.

श्री कालिका देवी मंदीर संस्थान, नाशिकचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.क्रीडा व युवक सेवा संचनालय, नाशिक विभाग उपसंचालक रविंद्र नाईक हे उपस्थित होते. संस्थानचे खजिनदार सुभाष तळाजिया, सरचिटणीस डॉ. प्रतापराव कोठावळे , शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानित अशोक दुधारे हे प्रमुख उपस्थितीत होते.

श्री. सुशांत घोडके यांना अनेक वृत्तपत्र, मासिक यामध्ये विशेष लेख प्रसिद्ध झाले आहे.तसेच ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. यात महाराष्ट्र शासनचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार (वन विभाग) तसेच ते स्वच्छ भारत अभियान स्वच्छतादूत आहेत.गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळ सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद(अहमदनगर जिल्हा शाखा) आणि हबाल रंगभूमी परिषद, प्रतिनिधी आहेत. महाराष्ट्र शासन ४८ वा राज्य नाट्य महोत्सव समन्वयक सहाय्यक म्हणून कामकाज पाहिले आहे. नाट्य मंदार पुरस्कार : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई, त्यांना कलाउपासक पुरस्कार (कलाध्यापक संघ), समाजरत्न पुरस्कार (जाणता राजा प्रतिष्ठान : भास्कर पेरे पाटील यांचे शुभहस्ते) सन्मानित करण्यात आले असून सूर्यतेज संस्था, कोपरगाव संस्थापक आहेत.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आनंद खरे, अशोक कदम, उदय खरे, दीपक निकम, दीपक पाटील, नितीन हिंगमिरे, राम पाटील, भरत पाटील, राजु शिंदे, शशांक वझे, अविनाश वाघ, अर्जुन वेलजाळी, अविनाश ढोली, ऋषिकेश रसाळ, ज्योती निकम, मनिषा काठे पदाधिकारी व सर्व कार्यकारीणी सदस्य यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन मिलिंद सुगंधी यांनी केले.श्री सुशांतजी घोडके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे