पत्रकार क्षेत्रातील लेखणीचे शिलेदार सतीश जाधव
पत्रकार क्षेत्रातील लेखणीचे शिलेदार सतीश जाधव
सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निर्भिड पत्रकार सतीश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पत्रकार सतीश जाधव यांची कायम धडपड सुरू असते.मनमिळावू स्वभाव,सर्व विषयात पारंगत,उत्कृष्ट पत्रकारिता यामुळे पत्रकार सतीश जाधव यांनी मोठी झेप पत्रकारिता क्षेत्रात घेतली आहे.आपल्या निर्भिड पत्रकारितेने समाज प्रबोधन करणाऱ्या सतीश जाधव यांच्या मुळे खऱ्या अर्थाने पत्रकारतेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने समाजातील वास्तव मांडले. आजच्या पत्रकारांनीही समाजातील खरे वास्तव मांडून निर्भीड पत्रकारितेतून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करावा असे ते नेहमी सांगत असतात

पत्रकारिता करत असताना पत्रकारांना अनेक अडचणींना तसेच अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागते. शाही लोकांच्या आमिषाला बळी न पडता लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारिता क्षेत्रात सत्य व निष्ठा जोपासणार्या निर्भीड पत्रकारांची नितांत गरज आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे, समाजाचे दुःख कमी करण्याचे काम पत्रकार करत असतात

निष्पक्ष पत्रकारिता हे समाजोन्नतीचे उत्तम साधन आहे. कुणाच्या भीकेला बळी न पडता सामाजिक प्रश्न व्यवस्थेसमोर निर्भीडपणे मांडणार्या निस्वार्थ पत्रकारांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा असतो.असे हे सतिष जाधव यांचा वाढदिवस १९ जानेवारी रोजी साजरा झाला त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहे


