महाराष्ट्र

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा…

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा…

संपादक:- रवीद्र जगताप

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. योग मार्गदर्शक अनिल अमृतकर यांनी योग साधनाविषयी माहिती सांगत योगासनाचे प्राथमिक प्रकार सादर केले. योग प्रात्यक्षिके आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक प्रज्वल आदिनाथ ढाकणे व वैष्णवी आदिनाथ ढाकणे यांनी सादर केले.त्यामध्ये शिर्षासन, वृक्षासन मयुरासन, व्याघ्रासन, हनुमानासन, पूर्णचक्रासन या सारखी योगासने प्रात्यक्षिक करुन दाखवत त्याचे शारीरिक फायदे विदयार्थींना सांगितले

जाहिरात

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे मार्गदर्शनाखाली योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री.सुरेश गोरे सर यांनी योग दिन कार्यक्रमाचे संयोजन केले.या प्रसंगी विदयालयांतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी यावेळी योग प्रात्यक्षिके मध्ये सहभागी झाले होते.शेवटी उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी आभार मानले.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे