गुन्हेगारी

इंधनचोर पकडले,कोपरगाव पोलिसांची कारवाई

इंधनचोर पकडले,कोपरगाव पोलिसांची कारवाई

कोळपेवाडी ता. कोपरगाव येथुन डिझेल चोरी करणारे आरोपी कोपरगाव तालुका पोलीसांनी शिताफिने केले जेरबंद

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 162/2023 भा.द.वि.क. 379,411,34 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.दिनांक 24/03/2023 रोजी सायंकाळी 06:30 ते दिनांक 27/03/2023 रोजी सकाळी 07:45 वा. सुमारास सिध्देश्वर ग्रामीण पतसंस्था कोळपेवाडी समोर ता. कोपरगांव येथून चांगदेव साहेबराव कदम य 45वर्षे धंदा चालक रा. कुंभारी ता. कोपरगाव हे चालक असलेली स्कुल बस क्रमांक एमएच 17 बी बाय 9328 ही उभी केलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी तिचे डिझेल टाकीतील 6900 रुपये किंमतीचे 75 लिटर डिझेल स्वतःचे आर्थीक फायदयासाठी लवाडीचे इरादयाने चोरून नेले, वगेर मजकुरच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास करत असताना गुप्त बातमीदामार्फत सदर गुन्हयातील डिझेल चोरी करणार आरोपी बाबत खात्रीशिर माहिती मिळाल्याने, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस पथक य मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो शिर्डी विभाग यांचे पथक यांनी मिळालेल्या माहितीचे आधार आरोपी नामे अमोल अविनाश कुंदे वय 19 वर्षे रा. एकरुखे ता. राहाता याचा शोध घेतला असता ता मिळुन आला. त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली तेव्हा त्याने डिझेल चोरीची कबुली देवुन त्याने चोरी केलेल्या मालमत्तेपैकी काही मालमत्ता आरोपी नामे (2) रविंद्र उर्फ भगवान भिकाजी भातकुटे वय ३५ रा. भातकुटे वस्ती राहाता यांस विकली असल्याचे सांगीतल्यावरुन तात्काळ त्यास अटक करण्यात आली असून, त्याने 9706/- रु किंमतिचे  चे 105 लिटर डिझेल भरलेले निळे रंगाचे 3 ड्रम काढुन दिले आहे. अशा प्रकारे डिझेल चोरीचा गुन्हा पोलीस पथकाने उघडकीस आणला आहे. तसेच सदर गुन्हयात आणखी इतर आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

सदरची कौतुकास्पद कामगीरी मा. पोलीस अधिक्षक, श्री राकेश ओला सो. मा. अपर पोलीस अधिक्षक सो, स्वाती भोर मँडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री संजय सातव सो यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे श्री वासुदेव देसले पोलीस निरीक्षक, श्री तुषार धाकराव पोलीस उपनिरीक्षक, पो.ना. विलास कोकाटे, पो.ना. किसन सानप, पो.कॉ. रशिद शेख, मा. एस.डी.पी.ओ सो शिर्डी पथकातील पो.हे.कॉ इरफान शेख, पो.ना. कृष्णा कुन्हे, पो.ना. शिंदे यांनी केली आहे. सदर आरोपींनी अशाच प्रकारचे डिझेल चोरीचे गुन्हे केले आहे अगर कसे ? याबाबत पुढील तपास पोलीस कसोशीने करत आहेत.



कोपरगाव तालुक्यातील नंबर १चे व सर्वात जास्त वाचक असलेले सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे