सामाजिक

राष्ट्र सेवेतून ‘राष्ट्र निर्माण’ कार्यात तरुणांनी सहभागी व्हावे…-पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांचे आवाहन

राष्ट्र सेवेतून ‘राष्ट्र निर्माण’ कार्यात तरुणांनी सहभागी व्हावे…-पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांचे आवाहन

कोपरगांव तालुक्यातील डाऊच बु|| ग्राम येथे के. जे. सोमय्या महाविद्यालय वतीने विशेष श्रम संस्कार शिबीराचे आयोजन…

भारतीयांच्या मनामनात राष्ट्र सेवेची भावना महत्त्वाची असून ‘राष्ट्र निर्माण’ पथदर्शी कार्यात तरुणांनी सहभागी व्हावे. असे आवाहन महाराष्ट्र शासनाचे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि के. जे. सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत डाऊच बु|| ग्राम येथे हिवाळा ऋतूत सात दिवसीय निवासी विशेष श्रम संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी समारोपाचे विचार पुष्प गुंफण्यासाठी सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. श्री. घोडके म्हणाले, पुर्वीच्या काळी गोदातीर परिसर हा दंडकारण्य परिसर म्हणून ओळखला जात.वनवास काळात राम याच मार्गाने भ्रमंती करत पुढे गेले.असे सांगत ते पुढे म्हणाले, रामराज्याचा आदर्श जपत समर्पित भावनेने राष्ट्र निर्माण कार्यात झोकून कार्य होणे महत्त्वाचे आहे.पुर्वीच्या दंडकारण्याचे वैभव वृक्षारोपण आणि पालकत्व अभियंतून निर्माण करण्याचा संकल्प करुया. असे सांगितले.

जाहिरात

या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. एस. गायकवाड, प्रा. एस. एस. नागरे, प्रा. ए. व्ही. येवले यांनी केले.सुत्रसंचालन अनुजा पवार तर आभार पार्थ जाधव यांनी मानले. व्याख्यानास डाऊच बु|| चे ग्रामस्थ,राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, जि.प.प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शिबिरार्थींंनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे