ब्रेकिंग

कोपरगाव मतदार संघातील ६.६९ कोटीच्या रस्ते कामाच्या निविदा प्रसिद्ध

कोपरगाव मतदार संघातील ६.६९ कोटीच्या रस्ते कामाच्या निविदा प्रसिद्ध

कोपरगाव-कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या विविध रस्ते कामाच्या ६.६९ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील रस्त्यांसाठी शेकडो कोटीचा निधी मिळवून मतदार संघातील रस्त्याचा विकास साधला आहे. सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर असलेल्या निधीतून त्या कामांच्या निविदा तातडीने प्रसिद्ध करून लवकरात काम सुरु व्हावे यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील विविध रस्त्यांच्या ६.६९ कोटीच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

जाहिरात

यामध्ये कोपरगाव, धारणगाव,सोनारी, चास, वडगाव, बक्तरपुर जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करणे ३ कोटी ६६ लक्ष ११ हजार, प्रजीमा ५ पासून मनाई वस्ती ते औद्योगिक वसाहत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे,०१ कोटी ५१ लक्ष ८४ हजार व ग्रा.मा.६३ राहाता चितळी रोड ते पुणतांबा रस्ता ०१ कोटी ५१ लक्ष ६१ हजार निधीच्या आदी रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीचा मागील अनेक वर्षापासूनचा प्रश्न निकाली निघून रस्त्यांची मोठी अडचण लवकरच दूर होणार असल्यामुळे या रस्त्यांचा दळणवळणासाठी नियमित वापर करणाऱ्या नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे