ब्रेकिंग

महापरिनिर्वाण दिनी फटाके वाजविणाऱ्या कोल्हेंना आंबेडकरी समाज कधीही माफ करणार नाही – प्रकाश दुशिंग

महापरिनिर्वाण दिनी फटाके वाजविणाऱ्या कोल्हेंना आंबेडकरी समाज कधीही माफ करणार नाही – प्रकाश दुशिंग

कोपरगाव -आंबेडकरी समाज बांधवांचा उद्धार करून समाजात सन्मानाची वागणूक मिळवून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी फटाके फोडून बँड वाजवणाऱ्या कोल्हे कुटुंबाचे आंबेडकर बांधवांविषयी बेगडी प्रेम आंबेडकरी समाजाने पाहिले आहे.त्यामुळे आंबेडकरी समाज कोल्हेंना कधीही माफ करणार नाही असे आंबेडकरी समाजाचे नेते प्रकाश दुशिंग यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

प्रसिद्धी पत्रकात प्रकाश दुशिंग यांनी पुढे असे म्हटले आहे की, आ. आशुतोष काळे यांच्या खांद्यावर मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी आहे. त्यामुळे मतदार संघाच्या विकासासाठी त्यांचा अविरतपणे पाठपुरावा सुरु असल्यामुळे मतदार संघाच्या विकासाचा आकडा तीन हजार कोटी पर्यंत पोहोचला असून त्यापुढे हा आकडा घेवून जाण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु असून सामाजिक केंद्रीय मंत्री ना.रामदासजी आठवले साहेब कोपरगाव दौऱ्यावर आले असता आ.आशुतोष काळे मतदार संघात उपस्थित नव्हते त्याचा संबंध कोल्हेंनी राजकारणाशी  जोडून आपली विचार प्रगल्भता किती तोकडी आहे हे दाखवून दिले आहे हि त्यांची हतबलता असली तरी मात्र कोल्हे समजतात तेवढा आंबेडकरी समाज बांधव एवढा देखील दुधखुळा नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे.    ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले असल्यामुळे या दिवशी संपूर्ण आंबेडकरी समाज अत्यंत दु:खात असतो संपूर्ण देशभर या महामानवास अभिवादन करून मानवंदना दिली जाते. मुंबई येथे चैत्यभूमीवर देशभरातून लाखोंचा जनसागर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येतो. त्याचबरोबर  देशभरात ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहेत त्या त्या ठिकाणी समाज बांधव दु:खद अंतकरणाने मानवंदना देतात. परंतु ६ डिसेंबर २०१८ रोजी आंबेडकरी समाजाशी खोटे प्रेम असणाऱ्या माजी आमदार कोल्हेंनी कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळच ढोल-ताशे बडवून फटाके फोडत आंदोत्सव साजरा केला त्या कोल्हेंनी संविधान आणि सन्मानाची भाषा बोलणे म्हणजे हास्यास्पद असून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. कर्मवीर शंकररावजी काळे,साहेब, माजी आमदार अशोकराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आ. आशुतोष काळे यांनी आंबेडकरी समाजासाठी योगदान दिले आहे.त्यामुळे आंबेडकरी समाज त्यांच्या पाठीशी आहे. जो लोकप्रतिनिधी आपल्या समाजासाठी योगदान देतो, समाजाचा नेहमीच त्याचा विचार करतो. तो कोणताही समाज असो, तो समाज नेहमीच त्याच्याच पाठीशी उभा राहतो कोणताही समाज मतदानापोटी बांधील नसतो हे कोल्हेंना कधी समजणार?असा प्रश्न प्रकाश दुशिंग यांनी विचारला आहे .दिवंगत व्यक्तींबाबत बोलने उचित नाही हि शिकवण आम्ही जपतो अन्यथा अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टी कोल्हे परिवार विसरला असेल मात्र आंबेडकरी समाज विसरलेला नाही याचे भान ठेवावे असे प्रकाश दुशिंग यांनी म्हटले आहे.

स्वत:च्या स्वार्थासाठी समाजाचा उपयोग करू नका————

 तुम्हीच आमच्या बापाचा अपमान करायचा आणि आमचा वापर करायचा हे आंबेडकरी समाज बांधव कधीच विसरू शकत नाही.२०१८ ला तुम्ही आमच्या बापाचा अपमान केला ते देखील आम्ही विसरलो नव्हतो. आमच्या बापाच्या अपमानाचा बदला तर आम्ही २०१९ च्या निवडणुकीत केव्हाच घेतला असून आमचा अपमान करणाऱ्या सोबत राहायचे नाही हे आंबेडकरी समाज बांधवांनी तेव्हाच ठरवून टाकले आहे. मात्र ज्यांना आपल्या बापाचा अपमान होवून देखील तुमच्या सोबत रहावेसे वाटते त्यांच्या देखील समाजनिष्ठेविषयी या निमित्ताने शंका उपस्थित होत असून स्वत:च्या स्वार्थासाठी समाजाचा उपयोग करण्याचे बाबासाहेबांनी आपल्याला शिकविले नाही यातूनच त्यांनी योग्य तो बोध घ्यावा-प्रकाश दुशिंग

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे