महाराष्ट्र

गौतमच्या ‘माईज गार्डन’ च्या फुलझाडांना तुषार सिंचन सुविधा   

गौतम पब्लिक स्कूल मध्ये ‘माईज गार्डन’च्या फुलझाडांसाठी सुरु करण्यात आलेल्या तुषार सिंचन सुविधा उद्घाटन प्रसंगी सौ.चैतालीताई काळे.

गौतमच्या ‘माईज गार्डन’ च्या फुलझाडांना तुषार सिंचन सुविधा   

कोपरगाव :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल मध्ये सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर असून संस्थेच्या माजी उपाध्यक्षा स्व.सौ. सुशीलामाई काळे यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्त उभारण्यात आलेल्या ‘माईज गार्डन’च्या फुलझाडांना तुषार सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या सुविधेचे उद्घाटन नुकतेच काल संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी सौ.चैतालीताई काळे यांनी सांगितले की, सौ.सुशीलामाई यांचे सामाजिक कार्य मोठे असून त्यांची आठवण म्हणून त्यांच्या नावे निर्मिती कररण्यात आलेल्या भव्य ‘माईज गार्डन’ मुळे नेहमीच प्रेरणा मिळत राहणार आहे. त्यांच्या विचारांची जपणूक करतांना ‘माईज गार्डन’ मधील फुलझाडांसाठी पाण्याचा काटेकोर वापर व्हावा यासाठी तुषार सिंचन सुविधा करण्यात आली त्याबद्दल समाधान व्यक्त करून ‘माईज गार्डन’ मधील फुलझाडांची पाहणी केली.‘माईज गार्डन’च्या उभारणीसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पालक, वर्ग शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, एनसीसी, स्काऊट, गाईड, दहावीचे विद्यार्थी यांनी योगदान दिले आहे. ‘माईज गार्डन’ विविध फुलांनी बहरले असून यामध्ये गुलाबाच्या विविध प्रजाती असून यामध्ये विविधरंगी शेवंती, जरबेरा, डार्क कन्हेर, एक्झॉरा, कोनो कारपस व इतर अशी हजारपेक्षा जास्त फुल झाडे लावण्यात आली आहे. याप्रसंगी शाळेची प्राचार्य नूर शेख, ‘माईज गार्डन’ कमिटी, जगदीश गोसावी, हाउस मास्टर्स व निवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे