महाराष्ट्र

अकरा गोवंश जनावरांची कत्तलीपासून केली सुटका कोपरगाव शहर पोलिसांच्या पथकाची धडक कारवाई

अकरा गोवंश जनावरांची कत्तलीपासून केली सुटका कोपरगाव शहर पोलिसांच्या पथकाची धडक कारवाई

कोपरगाव / प्रतिनिधी:-शहरातील सुभाषनगर येथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेल्या अकरा गोवंश जनावरांची सुटका प्रभारी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली आहे.याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सुभाषनगर येथील समध फकीरमोहम्मद कुरेशी याने घराच्या आडोशाला चार गाई व सात गोर्‍हे कत्तल करण्याच्या उद्देशाने अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवलेले होते. याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक आणि सध्याचे शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वासुदेव देसले यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता वरील वर्णनाची अकरा गोवंश जनावरे आणि गोमांस आढळून आले. पोलिसांनी या जनावरांची कत्तलीपासून सुटका करुन कत्तलीसाठी वापरण्यात येणारे हत्यारे व गोमांस ताब्यात घेतले. याप्रकरणी पोकॉ. ज्ञानेश्वर भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन समध फकीरमोहम्मद कुरेशी आणि मुन्तजीर रौफ कुरेशी या दोघांवर गुरनं. 04/2023 भा.दं.वि. कलम 429, 34 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम 2015 चे कलम 5(अ)(ब)(क), 9 व प्राण्यांस निर्दयीपणे वागवणे कलम 11(1)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. डी. आर. तिकोणे हे करत आहे. या कारवाईबद्दल शहर पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे